युवासेनेच्या दणक्याने नवजात बालकाला डिस्चार्ज
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 02, 2022
- 582
पनवेल ः उपचाराचे अव्वाच्यासव्वा बील आकारून नवजात बालकाला अडकवून ठेवणार्या मुजोर हॉस्पिटलला युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या दणक्यानंतर डिस्चार्ज मिळवून देण्यात आला. या बालकावरील उपचारासाठी हॉस्पिटलने चक्क 27 लाखांचे बील लावले होते. बिलाची पुर्ण रक्कम दिल्याशिवाय डिस्चार्ज मिळणार नसल्याचे सांगून तब्बल 20 दिवस डिस्चार्ज पुढे ढकलला. अखेर युवा सेनेच्या दणक्यानंतर रुग्णालयाने बिलातील नऊ लाख रुपये कमी करुन बालकाला डिस्चार्ज दिला.
खारघरमधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये 5 महिन्यांत जन्मलेल्या बाळावर गेले चार महिने उपचार सुरू होते. अकाली (प्रिमॅच्युअर बेबी) बाळ जन्मल्यामुळे इलाज खूप गुंतागुंतीचा होता. रुग्णालयात दाखल करत असताना हॉस्पिटलकडून 15 लाख खर्च अपेक्षित सांगण्यात आला होता. कालांतराने उपचार चालू असताना डॉक्टरांच्या मतानुसार गुंतागुंत वाढल्याचे निमित्त करत नवजात बालकाच्या पालकांवर 27 लाखांचे बील मारण्यात आले. पालकांनी यातील 17 लाखांची रक्कम व्याजाने कर्जाऊ घेतली. उर्वरित रक्कम भरणे पालकांच्या कुवतीबाहेर होते. यासाठी त्यांनी गयावया करून पाहिले. मात्र, पाझर न फुटलेल्या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने पैसे न भरल्याच्या कारणास्तव नवजात बालकाला जवळपास 20 दिवस सोडले नाही. पैसे भरा आणि डिस्चार्ज घ्या, असा फतवा हॉस्पिटल प्रशासनाने या पालकांवर बजावला.
मूळचे कर्जत येथील रहिवासी असलेल्या वासीम जालानी यांच्याबाबत हे प्रकरण घडले होते. जालानी दाम्पत्याने शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मावळचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्याकडे तक्रार करत मदत मागितली. खासदार बारणे अधिवेशनाकरिता दिल्लीत असल्याने त्यांनी हे प्रकरण हाताळण्याची सूचना खारघर येथील युवासेना उपजिल्हाप्रमुख अवचित राऊत यांना दिली. राऊत यांनी शिवसेना विभाग संघटक रामचंद्र देवरे, विभागप्रमुख उत्तम मोर्बेकर, युवासेना उपतालुका प्रमुख अनिकेत पाटील, युवासैनिक संकेत पाटील, विजय रोकडे, प्रकाश राजपूत यांना सोबत घेऊन रुग्णालयातील अधिकार्यांशी चर्चा करुन उरलेले पैसे माफ करण्याची विनंती केली. चर्चेअंती अखेर रुग्णालय प्रशासनाने 9 लाखांचे बिल माफ करुन नवजात बालकाला डिस्चार्ज मिळवून दिला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai