हिवताप दिनानिमित्त व्यापक जनजागृती
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 29, 2026
- 37
पनवेल ः महापालिकेच्या वतीने आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक हिवताप दिनानिमित्त दिनांक 25 एप्रिल रोजी विविध ठिकाणी जनजागृती व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये हिवताप जनजागृती, तपासणी व मोफत उपचार यावर विशेष भर देण्यात आला असून महापालिका सातत्याने विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहिमा आणि मार्गदर्शन कार्यक्रम राबवत आले.
यानिमित्ताने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. 12 (तळोजा फेज-2) अंतर्गत एल अँड टी सिडको बांधकाम कामगार वसाहतीत विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये मलेरिया तपासणीसाठी रक्त नमुने घेणे, तपासणी करणे तसेच हिवताप प्रतिबंधाबाबत सविस्तर जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात एमपीडब्ल्यू, एएनएम, लॅब टेक्निशियन तसेच इतर आरोग्य कर्मचारी सक्रियपणे सहभागी झाले होते. यावेळी रुग्णांना मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. याबरोबरच बांधकाम स्थळांवर विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. पालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिसरात आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. शाळांमध्ये आरोग्य चर्चांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये हिवतापाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली व जनजागृती रॅली काढण्यात आली.
महापालिकेच्या 27 आरोग्य केंद्रांच्या स्तरावर व्यापक हिवताप जागरूकता अभियान राबविण्यात येत असून, आवश्यकतेनुसार रुग्णांना वैद्यकीय आरोग्य विभागाकडून पुढील उपचारांसाठी शिफारस करण्यात येत आहे. हिवताप नियंत्रणासाठी नियमित ताप रुग्ण सर्वेक्षण, कंटेनर सर्वे ,कीटकजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात येते. तसेच हिवताप व इतर कीटकजन्य आजाराने बाधित रुग्णांना मोफत औषध उपचार करण्यात येतात. संबंधित भागात महापालिकेच्या वतीने नियमित फॉगिंग व कीटकनाशक फवारणी देखील करण्यात येत आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर हिवताप अधिकारी डॉ. आकाश ठसाळे यांच्या देखरेखीखाली हे सर्व कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai