मनसेच्या शिवजनसंपर्क अभियानाला सुरुवात
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 21, 2022
- 560
अमित ठाकरेंच्या हस्ते 3 मनसे शाखांचे उद्घाटन
नवी मुंबई ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन मनसेच्या नवी मुंबईतील नवीन तन शाखांचे उद्घाटन तसेच शिवजनसंपर्क अभियानाचा शुभारंभ मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी सामाजिक उपक्रम व संकल्प स्वीकारून मनसेने अनोखे उपक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी मनसेचे नवी मुंबईतील पदाधिकारी व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवी मुंबई शहरात 19 फेब्रुवारी ते 02 मार्च या कालावधीत मनसे आयोजित शिवजनसंपर्क अभियाना राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत सुमारे दीड ते दोन लाख नवी मुंबईकरांशी थेट संवाद व 20 ते 25 हजार नवी मुंबईकरांच्या घरोघरी जाऊन भेटी घेणार आहेत. या भेटींमध्ये नवी मुंबई शहरातील महिला भगिनी, विविध बचत गट, तरुण युवक मंडळे, पर्यावरणप्रेमी, डॉक्टर, अधीवक्ते, वास्तूविशारद, अभियंते, तसेच कला क्षेत्रातील मंडळी, कामगार वर्ग, तसेच बुद्धिजीवी लोकांचा समावेश असल्याचे व त्यांचे शहर विकासाबाबत संकल्पना, विचार व दृष्टिकोन जाणून घेतले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी वृक्षरोपण व त्या वृक्षांना दत्तक घेणे, वाचनालयाला पुस्तके भेट देणे व महिला सफाई कामगारांना रेशन कीट देणे असे निरनिराळे उपक्रम राबविण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक व जनसमुदाय उपस्थित होता. महाराष्ट्र सैनिकांनी जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. नेरूळ येथील मनसे विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड यांच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी 25 झाडांचे वृक्षरोपण करून या सर्व वृक्षांना मनसेच्या शाखेने दत्तक घेतले आहे. यावेळी मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्वतः वृक्षरोपण केले व या अभिनव उपक्रमाचे कौतुक वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आशिया खंडातील सर्वात छोटी गिर्यारोहक श्रविका म्हात्रे हिला देखील सन्मानित करण्यात आले. जुईनगर येथील मनसे विभाग अध्यक्ष अक्षय भोसले यांच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी नवी मुंबईतील कुसुमाग्रज वाचनालयाला पुस्तकांचा संच मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला. घणसोली येथील मनसेच्या रस्ते आस्थापना व साधन सुविधा विभागाचे शहर संघटक संदीप गलुगडे यांच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी विभागातील महिला सफाई कामगार यांना एक महिन्याचे रेशन कीट अमित ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, प्रसाद घोरपडे, सचिव सचिन कदम, विलास घोणे, सचिन आचरे, सह-सचिव अमोल इंगोले, अभिजित देसाई, दिनेश पाटील, शरद डीघे, नितीन लष्कर, व मनसेच्या संलग्नित सेलचे सागर नाईकरे, किरण सावंत, अप्पासाहेब कोठुळे, सनप्रीत तुर्मेकर, एड.निलेश बागडे व मोठ्या संख्येने स्थानिक मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai