लोकलमधील हत्येनंतर रेल्वे पोलिस अलर्ट
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 04, 2026
- 32
सर्व स्थानकांवर सरप्राईज चेकिंग; नशेत प्रवास करणाऱ्यांवर कारवाई
नवी मुंबई : बोरिवली येथे लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर मुंबई लोहमार्ग पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वाशी रेल्वे पोलिसांनी आपल्या हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकांवर सरप्राईज चेकिंग मोहीम सुरु केली आहे. मंगळवारी दुपारी वाशी रेल्वे स्थानकात पोलिसांनी प्रवाशांच्या बॅगांची सखोल तपासणी केली. यावेळी संशयास्पद वस्तू घेऊन प्रवास करणाऱया तसेच मद्यसेवन करुन वावरणाऱया काही लोकांवर कारवाई केली.
मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त यांच्या आदेशानुसार वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकांवर ही व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येकाच्या बॅगांची तपासणी केली जात असून शस्त्र, ज्वलनशील पदार्थ किंवा स्फोटक साहित्य बाळगणाऱयांविरोधात कठोर कारवाई केली जात असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिली.
याशिवाय रेल्वेत मद्यप्राशन करुन किंवा अमली पदार्थांचे सेवन करुन प्रवास करणाऱया प्रवाशांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत असून अशा प्रवाशांवर कायदेशीर कारवाई सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही विशेष मोहीम पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार असून, प्रवाशांनी तपासणीदरम्यान रेल्वे पोलिसांना सहकार्य करावे आणि कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai