कन्या जन्माचे करणार अनोखे स्वागत
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 01, 2022
- 927
25 हजारांची 21 वर्षासाठी एफडी करणार ; धुतूम ग्रामपंचायतचा निर्णय
उरण ः जागतिक महिला दिनानिमित्त धुतूम ग्रामपंचायतीने कन्या जन्माचे स्वागत अनोखे पद्धतीने करण्याचा निर्णय घेऊन इतरांपुढे एक आर्दश ठेवला आहे. 25 हजार रुपयांची 21 वर्षासाठी एफडी करून कन्या जन्माचे स्वागत करणार असल्याचा निर्णय उरण तालुक्यातील धुतुम ग्रामपंचायत तर्फे करण्यात येणार आहे. 22 फेब्रुवारी झालेल्या मासिकसभा व महिला ग्रामसभेत हा निर्ण घेणारी रायगड जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
कोरोनानंतर धुतूम ग्रामपंचायतची महिला ग्रामसभा झाली असून सोबत हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. सरपंच रेश्मा शरद ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिकसभा व ग्रामसभेत कन्या जन्माचे स्वागत योजनेचा ठराव संमत करण्यात आला होता. 8 मार्च 2022 पासून महिला दिनाचे औचित्य साधून धुतूम गावात जन्माला येणार्या प्रत्येक कन्या जन्माचे स्वागत योजना म्हणून रुपये पंचवीस हजारांची 21 वर्ष साठीची एफडी नव कन्येच्या नावे करण्यात येईल असा सर्वानुमते धाडशी निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी 8 मार्च 2022 पासून लागू होणार आहे. त्या वेळी महिलांनी या योजनेचे आणि सरपंच व सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. या सभेला सरपंच रेश्मा ठाकूर, माजी सरपंच सीताबाई ठाकूर, माजी उपसरपंच वैशाली पाटील, माजी उपसरपंच आशा ठाकूर, माजी उपसरपंच सविता ठाकूर, सदस्या पूजा ठाकूर, सदस्या निर्मला ठाकूर, करुणा घरत माजी उपसरपंच, रेश्मा रणधीर ठाकूर बचत गट अध्यक्ष , पूजा शक्ति ठाकूर, साधना प्रकाश ठाकूर, वंदना सदानंद ठाकूर, अलका रामचंद्र ठाकूर, शमिता दता ठाकूर, शोभा लक्ष्मण ठाकूर, प्राथमिक शाळा धुतूम महिला शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत महिला कर्मचारी, विविध महिला बचत गटाच्या प्रतिनिधी आणि भगिनींनी समारंभात सहभाग घेतला. या प्रसंगी ग्रामसेवक विनोद मोरे यांनी विविध योजनांची माहिती दिली तर उपसरपंच शरद ठाकूर यांनी अद्ययावत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची माहीती, येणार्या अडचणी व त्यावर मात करण्यासाठी आवश्यक सहकार्याची भूमिका महिलांकडून अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले. तर लवकरच प्रत्येक कुटंबाला ओला आणि सुका कचरा साठी कचराकुंड्या देण्यात येतील असे सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai