50 किलोपेक्षा जास्त मालाला प्रवेशबंदी करा
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 02, 2022
- 773
माथाडींच्या मागणीला पाठिंबा देण्याची व्यापार्यांची भूमिका
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न कांदा-बटाटा बाजार समितीत 50 किलोहून अतिरिक्त वजनाच्या गोणींची हाताळणी करण्यास माथाडी कामगारांचा विरोध असून यावर तोडगा काढण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने बाजार समितीतील सर्व घटकांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत माथाडी कामगार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. त्यामुळे बाजारात 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या मालाला बाजारात प्रवेश देऊ नये अशी भूमिका व्यपार्यांनी घेतली आहे.
शासन निर्णय असूनदेखील व वारंवार सूचना देऊनही वाशीतील कृषी उत्पन्न बाजारात 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोणी येत आहेत. याला विरोध दर्शवित माथाडी कामगार यांनी वेळोवेळी काम बंद आंदोलने केली आहेत. मात्र तरीदेखील बाजारात अतिरिक्त वजनाचा माल येत आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने 28 फेब्रुवारी रोजी प्रशासक इमारतीत सभापती अशोक डक यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी माथाडी कामगारांनी 50 किलोपेक्षा जास्त वजन उचलणार नाही ही आपली भूमिका ठाम ठेवली आहे. यावेळी व्यापारी यांनी बाजारात एपीएमसी प्रशासनाने जादा वजनाच्या गोणी बाजारात प्रवेश दिला जाऊ नये अशी भूमिका घेतली आहे. 50 किलोवरील अतिरिक्त भार उचलू नये असा शासन निर्णय आहे. मात्र त्याची अंमलबजावणी राज्यातील कुठल्याही बाजार समितीत होताना दिसत नाही. केवळ मुंबई कृषी उत्पन्न बाजार आवारात या निर्णयाची अंमलबजावणी होण्याकरिता व्यापारी प्रयत्न करीत आहेत. मात्र तरीदेखील अशा गोणी येत असून त्या उचलण्यास नकार दिला जात आहे. परिणामी व्यापार्यांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे बाजार समितीने अशा जास्त वजनाच्या गोणी आत सोडूच नयेत अशी मागणी व्यापार्यांकडून करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्यकारी अध्यक्ष व आ. शशिकांत शिंदे, संयुक्त सरचिटणीस नरेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील संयुक्त सरचिटणीस, कांदा बटाटा मार्केट संचालक अशोक वाळुंज, कांदा बटाटा आडत व्यापारी संघ, खरेदीदार संघ, नियंत्रण समिती यांचे अध्यक्ष, सचिव उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai