घरगुती सिलेंडर महागला
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 01, 2018
- 614
मुंबई : अनुदानित एलपीजी सिलिंडर वापरणार्या ग्राहकांच्या खिशाला आता भुर्दंड बसणार आहे. अनुदानित गॅससिलिंडर 1 रुपया 76 पैशांनी महाग झाला आहे. मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत. इंडियन ऑईल कार्पोरेशननं या दरवाढीची घोषणा केली आहे. इंधन दरवाढ आणि करप्रणालीमुळे ही दरवाढ करण्यात आली आहे.
जेव्हा आंतरराष्ट्रीय किंमती वाढतात तेव्हा सरकार अधिक सबसिडी देते. पण कर नियमांनुसार घरगुती गॅसवर जीएसटी इंधनाच्या बाजार मूल्यावर ठरवली जाते. अशात सरकार इंधनच्या किंमतीतील एक भाग सबसिडी म्हणून दिली जाते. पण कर बाजार भावानुसार द्यावा लागतो. याचा परिणाम घरगुती गॅसवर झाला असून त्याचा भाव वाढला आहे.
ग्राहकांना बाजार भावाच्या किंमतीतच सिंलेडर खरेदी करावा लागतो. पण सरकार वर्षभरात 14.2 किलोग्रॅमच्या 12 सिंलेडरवर सबसिडी देते. ही सबसिडी सरळ बँकेत जमा होते. याआधी सिलेंडर एक जुलैला पाऊने तीन रुपयांनी महागला होता. तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सिलेंडरच्या मुळ किंमतीत बदल करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाववाढीचे परिणाम घरगुती गॅसवर देखील झाला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai