दानपेटीतील अपहाराची रक्कम शेअर बाजारात गुंतवली?
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 10, 2026
- 21
राम मंदिर गैरव्यवहार प्रकरणात नवे खुलासे
अयोध्या ः राम मंदिरातील निधीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात तपास यंत्रणांना नवे धक्कादायक धागेदोरे मिळाले आहेत. चोरी केलेली रक्कम केवळ लपवलीच नाही, तर ती शेअर बाजारात आणि इतर आर्थिक गुंतवणुकीत वापरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांची 30 बँक खाती गोठवली आहेत.
तपासादरम्यान आरोपी अनुकल्प मिश्रा याला त्याच्या घरी नेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने सहआरोपी अविनाश शुक्ला याच्यासोबत दानपेटीतील कथित अपहाराची रक्कम शेअर बाजारात गुंतवल्याचे सांगितल्याची माहिती तपासाशी संबंधित सूत्रांनी दिली आहे. याशिवाय, आरोपींनी काही रक्कम व्याजाने दिली, तर काही पैसे नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींच्या बँक खात्यांमध्ये जमा करून नंतर पुन्हा स्वतःच्या खात्यांमध्ये वळवले, अशीही माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांची 30 बँक खाती गोठवली आहेत. या खात्यांमधील व्यवहार त्यांच्या अधिकृत उत्पन्नाशी विसंगत असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. आर्थिक तपास यंत्रणा आता या खात्यांमधील व्यवहार, शेअर बाजारातील गुंतवणूक, मालमत्ता खरेदी आणि रोख रकमेच्या हालचाली यांचा बारकाईने अभ्यास करत आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींच्या घरांची पुन्हा झडती घेतली. यावेळी फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि पंचांच्या उपस्थितीत कागदपत्रे, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, गुंतवणुकीशी संबंधित नोंदी आणि इतर पुरावे तपासण्यात आले. याच कारवाईत दानाच्या बनावट पावत्याही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे..
- दानपेटीतील पैसे कसे गायब केले जात होते?
तपास अधिकाऱ्यांच्या मते, आरोपींनी मंदिरातील दान मोजणी प्रक्रियेतील त्रुटींचा फायदा घेतला. संशय येऊ नये म्हणून दानपेटीतील रक्कम थोड्या-थोड्या प्रमाणात बाहेर काढली जात होती. ही रक्कम लगेच खर्च करण्याऐवजी ती विविध आर्थिक साधनांमध्ये गुंतवून त्यातून नफा कमावण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. - मालमत्तांचीही चौकशी
तपासादरम्यान काही आरोपींकडे त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या मालमत्ता चोरीच्या पैशातून खरेदी करण्यात आल्या का, याचाही तपास सुरू आहे.या प्रकरणामुळे राम मंदिरातील दान व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, पोलिसांकडून आर्थिक व्यवहारांचा प्रत्येक धागा तपासला जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai