शिवसेना विभाग प्रमुखाला मारहाण
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 06, 2022
- 708
नवी मुंबई : शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती कोळी व त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेच्याच विभाग प्रमुखाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील दिवाळे गाव स्मार्ट व्हिलेजच्या लोकार्पण सोहळ्याला भाजपाच्या व्यासपीठावरील उपस्थिती आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सत्कार स्वीकारतानाचे व्हिडीओ बेलापूर विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांनी वरिष्ठांना पाठवले होते. याचा राग अनावर झाल्याने भारती कोळी व त्यांच्या समर्थकांनी शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांना मारहाण केली. या घटने प्रकरणी शिवसेनेचे बेलापूर विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून एनआरआय पोलिसांनी माजी नगरसेविका भारती कोळी व त्यांच्या 8 समर्थकांवर मारहाण, शिवीगाळ करणे व धमकावणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai