एसआयआर अंंतर्गत मॅपींग करणे अनिवार्य
- by Aajchi Navi Mumbai
- May 26, 2026
- 26
नवी मुंबई ः निवडणुकीच्या मतदार याद्या अद्ययावत तसेच अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार याद्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत सन 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीमध्ये तयार करण्यात आलेल्या मतदार यादीतील मतदारांच्या नावाची सन 2002 मधील अंतिम मतदार यादीतील मतदारांच्या नावाशी ताळमेळ घालण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.
मतदारांनी आपले नाव विद्यामान 2024-25 च्या मतदार यादीत असल्याची खातरजमा करून घेणे व सन 2002 मधील मतदार यादीतील नावाशी पडताळणी व जुळवणी करून घेणे. सन 2024-25 मधील ज्या मतदारांची वयपूर्तता नसल्याने 2002 च्या मतदार यादीत नाव समाविष्ट नव्हते अशा मतदारांनी त्यांच्या नावाचे मॅपींग त्यांचे आई-वडील व वडीलांकडील आजी-आजोबा यांचे सन 2002 च्या यादीतील नावाशी करून घेणे. ज्यांची नावे सन 2002 च्या मतदार यादीत नाही त्यांचेकडून प्रत्यक्ष दरम्यान जन्माचे पुरावे घेणे
मॅपींगव्दारे भारतीय नागरिकत्वाची पडताळणी होणार असून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची ही सर्वात महत्वाची अर्हता आहे. नावाची पडताळणी व जुळवणी न केल्यास आपले नाव मतदार यादीत राहणार नाही. याचा थेट परिणाम नागरिकत्वामुळे मिळणाऱ्या लाभांवर होईल. मतदार यादीशी जोडून राहण्यासाठी सन 2002 मधील मतदार यादीत आपले स्वत:चे नाव असण्याचे अथवा नाव नसल्यास आपले आई-वडील किंवा आजी-आजोबा यांच्या नावाचे पुरावे सादर करणे, त्यांची पडताळणी करून घेणे ही प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे मॅपींग करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून प्रत्येक नागरिकाने मॅपींग करून घेणे गरजेचे आहे. या अनुषंगाने प्रत्येक मतदाराने 2002 च्या मतदार यादीतील आपले नाव व विद्यमान 2024 च्या यादीतील आपले नाव याची पडताळणी व जुळवणी करून घ्यायची आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai