1 मे पासून कोकण रेल्वेवर 10 एक्स्प्रेस विजेवर
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 23, 2022
- 550
मुंबई ः हिरव्या झाडीतून काळ्या धुरांच्या रेषा सोडणारी कोकण रेल्वे आता विजेवर चालणार असल्याने प्रदुषणापासून मुक्ती मिळणार आहे. इंधन बचत, प्रदूषण टाळणे यासह मेल, एक्स्प्रेस गाडीला डिझेल लोको जोडण्याच्या कटकटीतून सुटका करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर नुकतेच विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. कोकण रेल्वेने 1 मे चे औचित्य साधून पहिल्या टप्प्यात दहा गाड्या विजेच्या इंजिनाने चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मांडवी, जनशताब्दी, कोकणकन्या, मत्स्यगंधा, नेत्रावती, मंगला एक्स्प्रेसचा समावेश आहे.
यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास प्रदूषणमुक्त तसेच वेगवान होईल. रोहा ते ठोकूर असा 700 किलोमीटरचा कोकण रेल्वेचा मार्ग आहे. या पट्टयतील विद्युतीकरणाचे काम 2015 पासून हाती घेण्यात आले. विद्युतीकरणाचे काम सहा टप्प्यात हाती घेतले होते. रोहा ते रत्नागिरी, बिजूर ते ठोकूर, कारवार ते बिजूर, कारवार ते वेरणा, वेरणा ते थिविम आणि रत्नागिरी ते थिविम असे टप्पे होते. या सर्व टप्प्यांची कामे पूर्ण करण्यात आली. कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते थिविम या शेवटच्या टप्प्यातील विद्युतीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले. विद्युतीकरण नसल्यामुळे एखाद्या पट्टयत लांब पल्ल्याच्या गाडय धावताना समस्या येत होती. मध्य रेल्वेच्या रोहा स्थानकापर्यंत विद्युतीकरण असल्याने विजेवरील लोको मेल, एक्स्प्रेस गाडयंना जोडल्या जात होत्या. त्यापुढे विद्युतीकरण नसल्याने डिझेलवरील लोको जोडून मेल, एक्स्प्रेस चालवण्याशिवाय पर्याय नव्हता. ही समस्या आता दूर झाली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai