किक ऑफ दी ड्रीम कार्निव्हल उपक्रमाचे आयोजन
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 26, 2022
- 574
नवी मुंबई ः एनएमएमसी यशवंतराव चव्हान मैदानात सोमवारी 25 एप्रिल 2022 रोजी स्थानिक आयोजन समितीने (एलओसी) फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया-2022 स्पर्धेनिमित्त ‘किक ऑफ दी ड्रीम कार्निव्हल’ उपक्रमाचे अनावरण केले आहे. यादरम्यान नवी मुंबई परिसरातील सुमारे 650 हून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. या फुटबॉल कार्निव्हलमध्ये सर्वांसाठी फुटबॉल वर आधारीत मजेशीर मैदानी खेळ, विविध उपक्रम आणि विविध आव्हानांची निर्मिती करण्यात आली आहे.
फुटबॉलवर आधारीत या उपक्रमांच्या माध्यमातून चिमुकल्यांनी लैंगिक विषमतेला भेद देत मुक्तपणे आपल्या कलागुणांना वाव देणे, हा ‘किक ऑफ दी ड्रीम कार्निव्हल’ चे मुख्य उद्देश आहे. मुलांनी या उपक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सहभाग घेतला. हेडर चॅलेंज, अ फुटबॉल स्टाइल डार्ट बोर्ड चॅलेंज, फ्री कीक चॅलेंज हे लक्षवेधी उपक्रम ठरले. तसेच, यादरम्यान मुलांनी ब्रश आणि रंगांच्या सहाय्याने आपल्या कल्पकतेला आणि कलागुणांना वावही दिला. त्याचप्रमाणे यावेळी, ए-5 विरुद्ध 5 अशी फुटबॉल चॅलेंज स्पर्धाही अयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये तंदूरूस्ती स्पर्धेतील 16 संघांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमांमध्ये सहभागी होत मुलांना मजा मस्तीसोबतच सांघिक कामगिरी आणि नेतृत्त्व कौशल्य शिकण्यास मिळेल. यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक सदस्याचा उत्साह प्रेरणादायी आहे. शेवटी या उपक्रमामध्ये मुलांचा मिळालेला मोठा सहभाग फार उत्साहवर्धक असून भविष्यातील उपक्रमांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे एलओसी फिफा अंडर- 17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया-2022 च्या प्रकल्प संचालिका नंदिनी अरोरा यांनी सांगितले. या कार्निवल प्रसंगी क्रीडा विभागाचे उप आयुक्त मनोजकुमार महाले, शिक्षण विभागाचे उप आयुक्त जयदीप पवार, अंकुश अरोरा यांची विशेष उपस्थिती होती.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai