ग्लोबल खान्देश महोत्सवात घुमला आहिराणी आवाज
- by Aajchi Navi Mumbai
- May 03, 2022
- 690
पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीत आहिराणी गाणे होणार प्रदर्शित
खान्देशी संस्कृती आणि व्यापार उद्योगाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारे एकमेव व्यासपीठ ग्लोबल खान्देश महोत्सव. हा महोत्सव यंदा कल्याण येथे पार पडला. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत मराठी पाऊल पडते पुढे या चिराग पाटील आणि सिद्धी पाटणेच्या आगामी सिनेमाचे आहिराणी भाषेतील गाणे ‘हाऊ पोर्या अनेर काठणा’ हे या कार्यक्रमात लाँच करण्यात आले. या गाण्याचे संगीत इतके अनोखे आहे की उपस्थितांना त्यावर ताल धरायचा मोह आवरला नाही.
हे गाणे मुख्यत्वे चिराग पाटीलवर चित्रित झाले असून त्यावेळी कार्यक्रमस्थळी चिराग आणि सिध्दीने देखील गाण्यावर ठेका धरला आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह आला. या गाण्याचे गीतकार आणि गायक जळगाव भूषण पुरस्कार विजेते प्रवीण माळी या ठिकाणी उपस्थित होते. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने भगवे फेटे परिधान करत महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी अस्मिता जोपासली. या प्रसंगी अभिनेता चिराग पाटील सांगतो, आमचा आगामी सिनेमा मराठी पाऊल पडते पुढे मध्ये आम्ही मराठी तरुणांनी उद्योगक्षेत्रात यावे हे सांगत आहोत आणि असा संदेश देण्यासाठी ग्लोबल खान्देश महोत्सव यासारखे उत्तम व्यासपीठ दुसरे असूच शकत नाही. मी पहिल्यांदाच आहिराणी गाणे केले असल्यामुळे एक वेगळाच अनुभव मला मिळाला. गायक प्रवीण माळी यांच्या दमदार आवाजात गायलेले हे अहिराणी गाणे संपूर्ण महाराष्ट्राला आवडेल याची मला खात्री आहे.
या दरम्यान गीतकार गायक प्रवीण माळी यांनी स्वतः त्यांच्या भारदस्त आवाजात लॉन्च झालेले गाणे सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. शिवलाईन इन्कम ग्रोथ प्रा.लि. निर्मित मराठी पाऊल पडते पुढे सिनेमाचे सहनिर्माते चंद्रकांत विसपुते असून संगीत दिग्दर्शक समीर खोले यांनी सिनेमाची सर्व गाणी संगीतबद्ध केली आहेत. बाविस्कर ग्रुप, नवी मुंबई यांचे प्रमुख सहकार्य या चित्रपटाला लाभले आहे. स्वप्नील मयेकर दिग्दर्शित तसेच अभिनेता चिराग पाटील आणि अभिनेत्री सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, अभिनेते सतीश सलागरे आणि संजय कुलकर्णी या सर्वांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट मराठी पाऊल पडते पुढे हा एका धडाडी तरुण उद्योजकाची कथा आहे. या सिनेमाचे संगीत लेबल झी म्युझिक कंपनी असून पोस्ट प्रोडक्शन प्रोसेसिंग चे काम यूएफओ तर्फे झाले आहे. ऍक्शन, इमोशन्स आणि दर्जेदार डायलॉग्ज असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai