1499 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी
- by Aajchi Navi Mumbai
- May 07, 2022
- 1053
पनवेल ः पनवेल महापालिकेच्या आर्थिक वर्ष 2021-22 चे सुधारित व 2022-23 चा मूळ 1,499 कोटींचा अर्थसंकल्प गुरुवारी सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. यावेळी विरोधकांनी नामावलीसाठी सभात्याग केल्याने अवघ्या पाच मिनिटांत अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात कोणतीही दरवाढ, कोणतीही कर वाढ केलेली नाही.
अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर सीता पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आदी उपस्थित होते.
16 मार्च रोजी प्रशासनाने स्थायी समिती सभेपुढे एक हजार 499 कोटी रुपये जमा तर एक हजार 497 कोटी रुपयांच्या शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला होता. सुरुवातीला दोनवेळा सभा तहकूब केल्यानंतर 18 एप्रिल रोजी स्थायी समितीत अर्थसंकल्पाला किरकोळ बदल सूचवून मंजुरी देण्यात आली. गुरुवारी विशेष महासभा घेऊन अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी महासभेपुढे ठेवण्यात आला. स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांनी अर्थसंकल्पाची प्रत महापौरांना सादर केली. यावेळी काही नेत्यांची नावे न घेतल्याने विरोधकांनी गोंधळ सुरू झाला. विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, अरविंद म्हात्रे, डॉक्टर सुरेखा मोहकर व गणेश कडू यांनी महापौरांच्या आसनासमोर जाऊन निषेध केला तर प्रीतम म्हात्रे यांनी नरेश ठाकूर यांच्यासमोरचा माईक बंद केला. विरोधकांच्या गोंधळातच महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी अंदाज पत्रक मंजूर झाल्याचे जाहीर केले. सभागृह नेते परेश ठाकूर, नदरसेरक संतोष शेट्टी, प्रकाश बिनेदार यांनी विरोधकांच्या भुमिकेवर टीका करीत अर्थसंकल्पात मांडण्यासारखे काही मुद्दे नसल्यामुळे महत्वपुर्ण सभेत भाग न घेता विरोधक निघून गेल्याची टीका केली.
- सभात्याग चुकीचाच
अर्थसंकल्प महासभेपुढे येतो तो त्यावर चर्चा करण्यासाठी. मात्र विरोधकांनी कोणाचे नाव घेतले, कोणाचे नाही यासाठी सभात्याग केला हे अत्यंत चुकीचे आहे. कोणत्याही आर्थिक बाबींवर त्यांनी आपले मत मांडलेले नाही. सभापती मनोगत व्यक्त करतात ते त्यांचे वैयक्तिक असते. मात्र त्या कारणामुळे विरोधकांनी सभात्याग केला असेल तर ते चुकीचे आहे. - डॉ. कविता चौतमोल, महापौर - महत्वाच्या तरतूदी
- बांधकाम । 326 कोटी
- पाणीपुरवठा । 61.69 कोटी
- प्राथमिक आरोग्य केंद्र । 10 कोटी
- स्वराज्य पालिकेची प्र- इमारत । 40 कोटी
- घनकचरा शहर सफाई । 75 कोटी
- आस्थापना वेतनासाठी । 60 कोटी
- सिडको भुखंड हस्तांतरण । 40 कोटी
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai