नवीन आरोग्य केंद्रांसाठी जागेचा शोध
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 04, 2026
- 28
पनवेल ः राज्याच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे अतिरिक्त अभियान संचालक, मुंबई डॉ. जगन्नाथ विरकर तसेच सहाय्यक संचालक डॉ. दिप्ती देशमुख यांनी नुकतीच पनवेल महापालिकेस भेट देऊन राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य कार्यक्रम व योजनांचा सविस्तर आढावा घेतला.
या भेटीदरम्यान आयुक्त, पनवेल महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच आरोग्य संस्था स्तरावरील जनआरोग्य समिती, महिला आरोग्य समिती आणि महानगरपालिका स्तरावरील एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती यांच्या गठनाबाबत माहिती घेऊन समित्यांच्या बैठका नियमित आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. आढावा बैठकीत उपस्थित अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे व उपायुक्त (आरोग्य) प्रसेनजीत कारलेकर यांच्यासोबत भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अतिरिक्त आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. यासाठी सिडको प्रशासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच आयुष्मान भारत डिजिटल मिशन, माता व बाल आरोग्य, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण कार्यक्रम, राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम, कायाकल्प तसेच एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम आदी विविध आरोग्य योजनांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.
पनवेल महापालिकेमार्फत वैद्यकीय आरोग्य क्षेत्रात राबविण्यात येणारे विविध उपक्रम व नव्याने प्रस्तावित कामांचे सादरीकरण करण्यात आले. या कामांची दखल घेत अतिरिक्त अभियान संचालक, मुंबई यांनी पनवेल महापालिकेच्या कार्याचे कौतुक केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai