व्यवसाय आणि अर्थसहाय्य मार्गदर्शन शिबिर
- by Aajchi Navi Mumbai
- May 09, 2022
- 786
जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा स्तुत्य उपक्रम
पनवेल : पनवेलमध्ये प्रथमच विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून एका छत्राखाली व्यवसाय आणि अर्थसहाय्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात केंद्र सरकारचे विविध कोर्सेस ची माहिती देण्यासाठी संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते. तसेच कोर्स पूर्ण झाल्यावर आवश्यक ते परवाने काढल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मार्फत ज्या विविध सबसिडी कर्जही मिळतील. ते मिळण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी विविध नॅशनलाईज बँकांचे प्रतिनिधीसुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्ष, जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था व लक्ष्यपूर्ती वेलफेअर फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवसाय व अर्थसहाय्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्गदर्शन घेणार्या सदस्यांना व्यवसाय आणि अर्थसहाय्य मार्गदर्शक म्हणून खादी ग्रामोद्योग आयोगाचे नारायण कांबळे व राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळचे कांतायन जिन्हा तसेच इंडियन चेंबर ऑफ इंटरनॅशनल बिझनेसचे केलविन मेहता, तंत्राज हेल्थ केअर ब्युटी वेलनेस संचालिका डॉ.पल्लवी शिंदे, नॅशनलाईज बँकेचे सल्लागार, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोनल पाटील अशा विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांची उपस्थितीमध्ये मार्गदर्शन शिबिर पार पडले. यावेळी अनेक लघु उद्योजकांना त्यांच्या यशस्वी कारकिर्दी बद्दल सन्मान देऊन त्यांच्या अनुभवातून आणि प्रेरणादायी मार्गदर्शनातून उपस्थित लोकांना वास्तविक माहिती ऐकायला मिळाली. कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी पनवेल महानगरपालिकाचे विरोधी पक्षनेते प्रितम जे.म्हात्रे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या संचालिका ममताताई प्रितम म्हात्रे, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, नगरसेविका प्रीती जॉर्ज, ज्येष्ठ नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे, युवा नगरसेवक रवींद्र दादा भगत, लक्ष्यपूर्ती वेलफेअर फेडरेशनच्या अध्यक्ष मंजुषा परब, उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai