सिडकोने आधी प्रलंबित समस्या सोडवाव्यात
- by Aajchi Navi Mumbai
- May 19, 2022
- 483
पनवेल ः नवी मुंबईतील प्रकल्प आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सिडकोने पारगाव, ओवळे, कुंडेवहाळ या गावांना भूसंपादन करण्याबाबतच्या नोटीसा दिल्या आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीची बैठक समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. सिडकोने प्रलंबित असलेल्या समस्या आधी सोडवाव्यात आणि त्यानंतरच भूसंपदानाचा विषय काढावा, अशी ठाम भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.
लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने सातत्याने केलेल्या आंदोलनामुळे जागे झालेल्या सिडको व शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधकामासंदर्भात नुकताच एक शासन निर्णय घेतला आहे, मात्र तो निर्णय प्रकल्पग्रस्तांच्या हिताचा नसून सिडको आणि शासनाच्या सोयीचा आहे. हा निर्णय घेताना प्रकल्पग्रस्त संघटना व त्यांच्या प्रतिनिधींकडून कुठल्याही सूचना मागविलेल्या नाहीत. प्रकल्पग्रस्तांच्या 250 मीटरबाहेरील बांधकामांचे काय होणार याचे उत्तर सिडकोकडून अनुत्तरित आहे. याबाबत लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीची बैठक 5 मे रोजी झाली होती. त्यामध्ये 95 गावांतील शेतकर्यांची जमीन घेऊन अनेक प्रकल्प सिडकोने उभारले, मात्र आता गरजेपोटी घरांच्या बाबतीत सिडको व शासनाने घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. त्यामुळे या भूमीची मालकी हक्क असलेला प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र हा सिडकोने लादलेल्या निर्णयाच्या विरोधात असून प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी 24 जूनच्या नियोजित आंदोलनाप्रमाणे या विषयावरही आंदोलन करण्याचा इशारा त्या वेळी देण्यात आला होता.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai