31 मे रोजी महिला आरक्षण सोडत
- by Aajchi Navi Mumbai
- May 27, 2022
- 679
नवी मुंबई ः ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागले आहे. महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आता तिथल्या आरक्षणाची सोडत 31 मे रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीचे चित्र काहीसे स्पष्ट होणार असून इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या 2022 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यातकरिता 31 मे सकाळी 10 वाजता वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार आहे. आरक्षण काढल्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजे 1 जून रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. आरक्षणाबाबत 1 ते 6 जूनपर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत. त्यांचा विचार करून 13 जून रोजी अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध केले जाईल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai