माहिती अधिकार्यावर गुन्हा दाखल
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 10, 2022
- 1015
पनवेल : माहिती अधिकार 2005 अंतर्गत मागितलेली माहिती नवी मुंबईतील कोनगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने उपलब्ध न करून दिल्याने त्याच्याविरुद्ध नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती न दिल्याने जन माहिती अधिकार्याविरुद्ध दाखल झालेला हा देशातील पहिला गुन्हा आहे.
कानगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रमेश तारेकर यांच्याविरुद्ध भादंवि कलम 166, कलम 188, कलम 175, कलम 176, कलम 217 नुसार नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमित अरविंद काटनवरे यांनी तक्रार दाखल केली आहे. माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून मागितलेली माहिती देणे टाळण्यासाठी आता जन माहिती अधिकारी वेगवेगळी कारणे देऊ लागले आहेत. मात्र नवी मुंबईतील नवीन पनवेल पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे माहिती देणे नाकारणार्या शासकीय अधिकारी व कर्मचार्यांवर मोठा वचक बसू शकेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
कानगाव ग्रामपंचायतीने वित्त आयोगाच्या निधीचा केलेल्या खर्चाचा तपशील, वित्त आयोगाच्या निधीचा वापर कशाप्रकारे करावे याबाबतचे परिपत्रक, अनुसूचित जमातीच्या सदस्यांसाठी वापरलेल्या निधीचा तपशील आदी माहिती अमित कटानवरे यांनी हवी होती. त्यांनी कानगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रमेश तारेकर यांच्याकडे 14 जानेवारी 2022 रोजी माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून ही माहिती मागितली होती. ग्रामसेवकाने नियमानुसार एक महिन्याच्या आत ही माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक होते. मात्र ग्रामसेवकांनी माहिती न दिल्याने 11 एप्रिल 2022 रोजी काटनवरे यांनी पनवेलच्या विस्तार अधिकार्यांकडे अपील दाखल केले. यावर 14 एप्रिल 2022 रोजी सुनावली ठेवली असताना ही रमेश तारेकर या सुनावणीला हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत काटनवरे यांना 7 दिवसांच्या माहिती देण्याचे आदेश विस्तार अधिकारी यांनी दिले. मात्र तरीही 7 दिवसांच्या आत माहिती उपलब्ध न करून दिल्याने अखेर 6 जून 2022 रोजी नवीन पनवेल पोलीस ठाण्यात काटनवरे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai