जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 15, 2022
- 608
नवी मुंबई : व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी त्वरीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे या कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन समितीचे उपायुक्त तथा सदस्य यांनी केले आहे.
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणार्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिर्वाय आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यतः 3 महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र बाबत समिती निर्णय घेते. वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळणेपासून वंचित राहू नये यास्तव ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर केलेला नाही त्यांनी ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे, त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी त्वरित अर्ज करावा असे आवाहन धम्मज्योती गजभिये, महासंचालक, बार्टी तथा मुख्य समन्वयक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai