10 स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीला आव्हान
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 27, 2026
- 29
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने निवडलेल्या दहा स्विकृत नगरसेवकांच्या नियुक्तीला सामाजिक कार्यकर्ते राजीव मिश्रा यांनी निवडणुक याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. याचिकेत त्यांनी पालिका आयुक्तांनी कायदेशीर निवड प्रक्रिया राबवली नसल्याचा तसेच शासनाने निवडीसाठी घालून दिलेल्या निर्देशांचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. या याचिकेची सुनावणी 9 मार्च रोजी निश्चित करण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेत पहिल्या सर्वसाधारण सभेत दहा स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपच्यावतीने निवडलेल्या सहा नगरसेवकांमध्ये कुलदिप सुरी, भरत नखाते, जगजीवन केणी, अपर्णा गवते, अमित मेढक व लक्ष्मीकांत पाटील यांचा समावेश असून शिवसेनेच्यावतीने द्वारकानाथ भोईर, साहिल चौगुले, सुरेश भिलारे व अंकुश कदम यांची नेमणुक करण्यात आली आहे. निवडलेले सर्व स्वीकृत नगरसेवक हे राजकीय पक्षांशी निगडीत असून यापुर्वी अनेकांनी नगरसेवकपदीही भुषविले आहे.
शासनाने स्वीकृत नगरसेवक कशापद्धतीने निवडावे व त्यांनी अर्हता काय असावी याबाबतचे नियम 2012 साली जारी केले आहेत. या नियमांचे राजकर्त्यांकडून वारंवार उल्लंघन होत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अनिल चंदरलाल विरुद्ध महाराष्ट्र राज्य या याचिकेत 13 मार्च 2016 रोजीच्या निकालात स्वीकृत नगरसेवकांची निवड कोणत्या पद्धतीने करावी याबाबत निर्देश दिले आहेत. तक्रारदार राजीव मिश्रा यांनी शासनाचे 2012 चे स्वीकृत नगरसेवक निवडीचे नियम व मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश यांना बगल देऊन सदर निवड केली असल्याचा आरोप याचिकेत केला आहे. आपण आपला विरोध नोंदवला असतानाही पालिकेच्या सर्वसाधारण सभेने संबंधितांची नियुक्ती केली असल्याचा त्यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यांनी याचिकेमध्ये महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, सभागृहनेते सागर नाईक, विरोधीपक्षनेते विजय चौगुले, पालिका आयुक्त कैलास शिंदे, पालिका सचिव संघमित्रा खिल्लारे व स्वीकृत नगरसेवक यांना प्रतिवादी केले आहे. सदर याचिकेची सुनावणी 9 मार्च रोजी ठेवण्यात आली असून न्यायालय याबाबत कोणता आदेश देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
याचिकाकर्ते राजीव मिश्रा यांनी शासनाचे 2012 चे स्वीकृत नगरसेवक निवडीचे नियम व मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश यांना बगल देऊन सदर निवड केली असल्याचा आरोप याचिकेत केला आहे. आपण आपला विरोध नोंदवला असतानाही पालिकेच्या सर्वसाधारण सभेने संबंधितांची नियुक्ती केली असल्याचा त्यांनी याचिकेत म्हटले आहे. याचिकेमध्ये महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, सभागृहनेते सागर नाईक, विरोधीपक्षनेते विजय चौगुले, पालिका आयुक्त कैलास शिंदे, पालिका सचिव संघमित्रा खिल्लारे व स्वीकृत नगरसेवक यांना प्रतिवादी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai