दि.बांच्या नावाला मुख्यमंत्री ठाकरे यांची सहमती
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 28, 2022
- 590
मुख्यमंत्री ठाकरे यांची शिष्टमंडळाला आश्वासन
मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त गेल्या दोन वर्षांपासून लढा देत आहेत. नुकतेच सिडकोला घेराव आंदोलन करुन दि.बांच्या नावाची आग्रही मागणीही करण्यात आली. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत प्रकल्पग्रस्तांची मातोश्रीवर झालेल्या बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव देण्याचे एकमताने ठरविण्यात आले आहे. तसेच त्यांच्या नावाला माझा कधीच विरोध नव्हता, असेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरुन गेले दोन वर्ष वाद सुरु आहे. दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी आग्रही मागणी प्रकल्पग्रस्तांची आहे. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा शासनाचा प्रस्ताव मंजुर करुन सिडकोने शासनाकडे व शासनाने केंद्राकडे पाठवल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत. आंदोलन, बैठका, सभा घेऊन त्यांनी दि.बा.पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. अखेर त्यांच्या या लढ्याला यश मिळत असल्याचे दिसत आहे. आज प्रकल्पग्रस्त आणि आग्री, कोळी, कुणबी आदी समाजातील नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचे मान्य केले. तसेच जे नाव दिले ते एकनाथ शिंदे यांनी दिले होते. दि.बा.पाटील यांच्या नावाला माझा विरोध नाही असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव मिळण्यास हिरवा कंदिल मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai