पुनर्प्रकियाकृत पाणीविक्रिचा एमआयडीसीसोबत करार
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 23, 2022
- 529
केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत कोपरखैरणे व ऐरोली येथील सी-टेक या अत्याधुनिक तंत्रप्रणालीवर आधारित मलप्रक्रिया केंद्रात प्रत्येकी 20 द.ल.लि. क्षमतेचे टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट उभारण्यात आले आहेत. या टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट मधील पुनर्प्रक्रियाकृत सांडपाणी टिटिसी औद्योगिक क्षेत्रातील उद्योग समुहांना पुरविण्यात येणार आहे. तशा प्रकारचा करारही एमआयडीसी सोबत झालेला आहे.
अमृत योजनेअंतर्गत उभ्या राहणार्या या टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टचा 50 टक्के खर्च केंद्र व राज्य शासनामार्फत उपलब्ध होणार असून ऐरोली येथील प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून कोपरखैरणे टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टचे काम पूर्ण होऊन तेथे प्राथमिक चाचण्या सुरु झाल्या आहेत. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोपरखैरणे टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टला भेट देऊन तेथील संपूर्ण कार्यवाहीची पाहणी केली व सविस्तर माहिती घेतली आणि उद्योग समुहांना पुनर्प्रक्रियाकृत पाणी प्रत्यक्ष पुरविण्याची कार्यवाही एक महिन्याच्या आत सुरु करावी असे निर्देश अभियांत्रिकी विभागाला दिले. 20 द.ल.लि. क्षमतेचा कोपरखैरणे येथील टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टचे काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे 1.75 द.ल.लि. क्षमतेचा भूस्तरीय जलकुंभ उभारण्याचे कामही पूर्ण झालेले आहे. हे पुनर्प्रक्रियाकृत सांडपाणी वाशी व कोपरखैरणे टिटीसी औद्योगिक क्षेत्रातील उद्योग समुहांना पुरविण्यासाठी 53.134 कि.मी. लांबीच्या वितरण वाहिन्या टाकल्या जात आहेत. उद्योग समुहांना पुनर्प्रक्रियाकृत सांडपाणी पुरविण्यासाठी एमआयडीसी क्षेत्रात महापे येथे भूखंड क्रमांक ओएस 5 येथे 1.5 द.ल.लि. क्षमतेचा तसेच घनकचरा प्रक्रिया प्रकल्पानजिक तुर्भे येथे 2.5 द.ल.लि. क्षमतेचा आणि निब्बाण टेकडी रबाळे येथे 0.75 द.लि.लि. क्षमतेचा अशा 3 ठिकाणी उच्चस्तरीय जलकुंभ उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पांमधील पुनर्प्रक्रियाकृत पाणी उद्योग समुहांना पुरविल्यामुळे महानगरपालिकेच्या महसूलात भर पडेलच याशिवाय महत्वाचे म्हणजे सध्या उद्योग समुहात वापरले जाणारे पिण्याचे पाणी बचत होऊन नागरिकांच्या वापरात येणार आहे. याशिवाय सध्या रू. 22.50 मात्र प्रति घनमीटर इतक्या दरात उद्योग समुहांना उपलब्ध करून घ्यावे लागणारे पाणी महानगरपालिकेकडून रू.18.50 मात्र प्रति घनमीटर रक्कमेत उपलब्ध होणार असल्याने पाणी विकत घेण्यासाठी उद्योगसमुहांना येणार्या खर्चात पुनर्प्रक्रियाकृत पाणी वापरल्याने बचत होणार आहे. एमआयडीसीला हे पाणी विक्री करून महापालिकेने 500 कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. परंतु सध्या 450 एमएलडी पाणी पुरवठ्यापैकी महापालिका सुरुवातीला 14 एमएलडी पाणी पुरवठा करण्याची तयारी केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai