अनधिकृत बांधकामावर दंडात्मक कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 20, 2022
- 505
नवी मुंबई ः तुर्भे विभागांतर्गत भूखंड क्र. 114, से. 5, सानपाडा, नवी मुंबई याठिकाणी विनापरवानगी सुमारे तळमजल्याच्या स्लॅबचे काम करण्यात आले होते. नोटीस पाठरल्यानंतरही काम सुरुच ठेवल्याने सदर अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे. तसेच निष्कासन कारवाईपोटी रक्कम एक लाख दंडात्मक वसुली देखील करण्यात आलेली आहे.
पालिका क्षेत्रातील तुर्भे विभाअंतर्गत सानपाडा सेक्टर 5 मध्ये पालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता सुमारे 12.00 मी. द 08.00 मी. व 12.00 मी. द 13.00 मी. इतक्या मोजमापाचे तळमजल्याच्या स्लॅबचे काम पूर्ण करण्यात आले होते. या अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु, सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरुच होते. सदर अनधिकृत बांधकामावर तुर्भे विभाग कार्यालयामार्फत तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करुन सदर अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले आहे. सदर अनधिकृत बांधकाम निष्कासन कारवाईपोटी रक्कम रु.1,00,000 इतकी दंडात्मक वसुली देखील करण्यात आलेली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai