आदीवासी वाड्यावर जातीचे दाखले वाटप
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 09, 2022
- 671
उरण ः उरण सामाजिक संस्थेने 05 नोव्हेंबर 2022 रोजी विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी रायगड, उप विभागीय अधिकारी पनवेल राहुल मुंडके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, तहसीलदार उरण भाऊसाहेब अंधारे आणि महसूल विभाग उरण यांच्या सहकार्याने उरण परिसरातील आदीवासी वाड्यांवर जातीच्या दाखल्यांचे वाटप केले. या उपक्रमाला आदिवासी बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
उरण सामाजिक संस्थेचे आदिवासी लोकांसाठी केलेल्या मागील दोन वर्षाचे काम पाहून विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांनी असे प्रामाणिक काम रायगड जिल्ह्यातील प्रत्येक वाडी वर होण्याकरीता उरण सामाजिक संस्थेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सर्व वाड्यांवर जातीचे दाखले काढण्याचे कॅम्प घेण्यासाठी विनंती केली असून तसे स्पष्ट आदेश सर्व उप विभागीय अधिकारी यांना दिलेले आहेत. दुंबाची कातकरी वाडी जासई, कोल्हापूर कातकरी वाडी चानजे, लिंबाची कातकरी वाडी , डाउर नगर कातकरी वाडी उरण येथे सर्व कातकरी बांधवांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले. प्रा राजेंद्र मढवी यांनी विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी रायगड, उप विभागीय अधिकारी राहुल मुंडके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, तहसीलदार उरण भाऊसाहेब अंधारे आणि सर्व मंडळ अधिकारी,आदिवासी विकास निरीक्षक, तलाठी, महसूल विभागाची टीम यांचे आभार मानले आहेत. आदिवासी दाखले वाटप शिबिराला आदिवासी बांधवांचे खूप मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने प्रा. राजेंद्र मढवी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai