रोहा-दिवा मेमूला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 16, 2022
- 575
पनवेल ः रोहा-दिवा मेमू ट्रेनला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून तसे आदेश संबंधित खात्याचे उपनिर्देशक विवेककुमार सिंह यांच्याकडून पारित करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच दिवा-रोहा प्रवास करणार्या नागरिकांचा प्रवास सुखकर होईल.
रोहा-दिवा मेमू ट्रेन सुरू करण्याच्या मागणीसाठी खासदार सुनील तटकरे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. लोकसभेच्या अधिवेशनातही प्रश्न उपस्थित करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. रोहा, तळा, म्हसळा, मुरूड या समवेत ग्रामीण भागातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने पनवेल, दिवा, मुंबई, ठाणे या ठिकाणी नोकरी व व्यवसायनिमित्त ये-जा करतात. तसेच पनवेल, मुंबई या ठिकाणी शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रोह्याहून पहाटे 5 नंतर मुंबई अथवा पनवेलला जाण्यासाठी दुसरी गाडी उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची हाल होतात. त्यामुळे रोहा स्थानकावरून लवकरात लवकर मेमू सुरू करावी, अशी मागणी रोहा रेल्वे प्रवासी महासंघाने खासदार तटकरे यांचेकडे केली होती.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai