सिडको घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 20, 2023
- 391
मंत्री दिपक केसरकर यांचा आशावाद
नवी मुंबई ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात रोजगार बरोबरच विविध प्रकल्प व विकास कामांची गंगा अवतरली आहे. मागील 22 वर्षापासून घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न माजी नगरसेवक किशोर पाटकर यांच्या अखंडित पाठपुरामुळे मार्गी लागला आहे. नवी मुंबईत आगामी कालावधीत सिडको आणि मोडकळीस आलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे, असा आशावाद मंत्री दिपक केसरकर यांनी वाशीतील कार्यक्रमात व्यक्त केला.
बाळासाहेबांची शिवसेना नवी मुंबई जिल्हा यांच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, पुनर्वसन योजनेतील लाभार्थ्यांना दस्तावेज वाटप, दिनदर्शिका प्रकाशन आणि पक्ष प्रवेश आदी कार्यक्रमांचे आयोजन वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी पुनर्बांधनीमधील लाभार्थ्यांना करारनाम्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंत्री केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात रोजगार बरोबरच विविध प्रकल्प विकसीत झाले आहेत. घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न माजी नगरसेवक किशोर पाटकर यांच्या पाठपुरामुळे मार्गी लागला आहे. नवी मुंबईत आगामी कालावधीत सिडको आणि मोडकळीस आलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले. तसेच जनतेचा आपल्यावर असणारा विश्वास अधिक दृढ करून आगामी कालावधीत नवी मुंबई पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा हीच खरी बाळासाहेबांना जयंतीच्या निमित्ताने समर्पित केलेली आदरांजली असेल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना उपनेते विजय नाहटा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून राज्यात आलेल्या नवनवीन योजनांची माहिती उपस्थितांना दिली तर आगामी कालावधीत नवी मुंबईकरांच्या समस्या देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला. नागरिकांना त्यांच्या हक्काच्या मिळालेले घर हीच खरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अर्पण केले असल्याचे म्हणाले. यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले, संपर्क प्रमुख व मेळाव्याचे आयोजक किशोर पाटकर, अशोक गावडे, सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील, सरोज पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai