नेरुळमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 24, 2023
- 483
नवी मुंबई ः पालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागांतर्गत घर क्र. 213, सारसोळे गांव, सेक्टर-6, नेरुळ, याठिकाणी तळमजजा + 4 मजल्याचे अनधिकृतपणे बांधकाम केले आहे. या बांधकामावर पालिकेच्यावतीने धडक कारवाई करण्यात आली.
सदर अनधिकृत बांधकाम अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त तथा नेरुळ विभाग अधिकारी सुनिल पाटील यांच्या नियंत्रणाखाली कनिष्ठ अभियंता रितेश पुरव यांच्या उपस्थितीत या अनधिकृत बांधकामावर तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात येऊन हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी नेरुळ विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, 08 मजूर, 02 पीकअप व्हॅन, 1 ब्रेकर तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai