नैनाविरोधात गाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 18, 2023
- 718
नवीन पनवेल ः सिडकोच्या बहुचर्चित नैनाविरोधात 12 फेब्रुवारीपासून पनवेल परिसरात गाव बंद साखळी आंदोलन केले जात आहे. माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनात सुकापूर, आदई, विहीघर, बोनशेत, पळस्पा गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे ‘नैना'विरोधात गावपातळीवर ग्रामस्थांमध्ये असंतोषाची लाट पसरल्याचे चित्र आहे.
नवी मुंबई एअरपोर्ट नोटिफाईड एरिया अर्थात नैना प्रकल्पाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांनी आरपारच्या लढाईचे हत्यार उपसले आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई, पनवेल, उरणमधील 270 पेक्षा अधिक गावे विमानतळबाधित म्हणून अधोरेखित करण्यात आली आहेत. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्या ठिकाणी नियोजित शहर वसवण्यासाठी सिडको प्रयत्नात आहे; पण शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने घेऊन मलिदा लाटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप प्रकल्पबांधितांकडून केला जात आहे. नैना क्षेत्रातील 23 गावांनी या प्रकल्पाविरोधात तीव्र संघर्षाची तयारी केली आहे. याच अनुषंगाने शेकापचे माजी आ.बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वात गावबंद साखळी आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनात नैना प्रकल्पबाधित उत्कर्ष समितीच्या वतीने ॲड. सुरेश ठाकूर, अध्यक्ष वामन शेळके, सचिव राजेश केणी, शेखर शेळके, नामदेव फडके, सुभाष भोपी, अनिल ढवळे यांच्यासह 23 गावांतील शेतकरी, नागरिक सहभागी आहेत.
- गावांतील अंतर्गत व्यवहार बंद
शेतकरी कामगार पक्ष, नैना प्रकल्पबाधित उत्कर्ष समिती आणि विविध सामाजिक संघटनांनी दिलेल्या नैनाविरोधी हाकेला शेतकऱ्यांसोबत गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नैना हटाव अभी नही तो कभी नही! अशी भूमिका या वेळी संतप्त गावकऱ्यांनी रविवारच्या ग्रामसभेत मांडली. - शासनाची आश्वासनांवर बोळवण
माजी आमदार बाळाराम पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत धोरण ठरवू, विमानतळ प्राधिकरण, सिडको मंडळ, नैना प्राधिकरणाची बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दीड महिना उलटला, तरी कोणतीच कारवाई झाली नसल्यामुळे 23 गावांमधील ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. - 20 फेब्रुवारी - बोनशेत-भोकरपाडा
- 21 फेब्रुवारी - नेरे
- 22 फेब्रुवारी- देवद
- 23 फेब्रुवारी- हरिग्राम केवाळे
- 24 फेब्रुवारी- खानाव
- 25 फेब्रुवारी- रिटघर
- 26 फेब्रुवारी- शिरढोण
- 27 फेब्रुवारी- कोन
- 28 फेब्रुवारी- बोर्ले
- 1 मार्च - चिखले
- 2 मार्च - कोळखे, पेठ, पारपुंड
- 3 मार्च- ऊसर्ली, डेरवली
- 4 मार्च- शिवकर
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai