गेट परीक्षेत जयदीप मोरे चमकला
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 05, 2023
- 389
पनवेल : तालुक्यातील करंजाडे नोडमध्ये राहणारा जयदीप मोरे हा गेट परीक्षेत अव्वल आला आहे. जयदीप हा विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयात कम्प्युटर सायन्स ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याला आयआयटीमध्ये एम.टेक्. करायचे आहे, म्हणून त्याने आयआयटी प्रवेशाची (गेट) नुकतीच परीक्षा दिली. या परीक्षेत जयदीपला 93.67 टक्के गुण मिळाले.
अभियांत्रिकीमधील कृतज्ञता अभियोग्यता चाचणी म्हणून गेटची राष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेतली जाते. या परीक्षेतील गुणवत्ता पदव्युत्तर अभियांत्रिकी आणि विज्ञान विषयांसाठी प्रवेश निश्चित केली जाते. जयदीपचे माध्यमिक शिक्षण पनवेलमधील सीकेटी शाळेत तर त्यानंतरचे अकरावी व बारावीपर्यंतचे शिक्षण महात्मा महाविद्यालयात झाले. जयदीपने तिसऱ्या वर्षाचा अभ्यास करीत असताना यापूर्वी गेटची परीक्षा दिली होती. गेल्या दोन वर्षांपासून जयदीप हा गेट परीक्षेसाठी अभ्यास करीत होता. त्याने महाविद्यालयातील मोबाइलवर येणाऱ्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त तो गेली दोन वर्षे सर्वच समाजमाध्यमापासून दूर राहिला. सध्या तो करंजाडे नोडमधील सेक्टर-4 येथे राहतो. फार कठीण असणाऱ्या गेट परीक्षेत अव्वल येण्यासाठी त्याने जुन्या प्रत्येक वर्षाच्या नोट्स काढून अभ्यास केल्याने हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. मोरे कुटुंबीय हे मूळच्या कोयना धरणासाठी ज्यांच्या जमिनी संपादित झालेल्या प्रकल्पग्रस्तांपैकी एक आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai