पालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शहरात पाणीटंचाई
- by Aajchi Navi Mumbai
- May 05, 2023
- 376
आ. गणेश नाईक यांचा आरोप; पाणीसमस्या दूर करण्याची मागणी
नवी मुंबई ः प्रशासकीय काळामध्ये शहरात पाण्याची समस्या वाढली. नवी मुंबईमध्ये पाणीटंचाईचे सबळ कारण नाही. शहरासाठी स्वतंत्र असे मोरबे धरण आहे, केवळ काही अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागतो आहे, असा आरोप आ. गणेश नाईक यांनी केला आहे. शहरातील पाणीटंचाई लवकरात लवकर दूर करा अन्यथा लोकहितासाठी पालिकेवर मोर्चा आणण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा इशारही नाईक यांनी यावेळी दिला.
आ. गणेश नाईक यांची 3 मे रोजी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये विशेषत्वाने पावसाळापूर्वक करावयाची कामे, नवी मुंबईकरांना भेडसावणारी तीव्र पाणीटंचाई, महापालिका आस्थापना वरील विविध संवर्गातील कंत्राटी तसेच ठोक आणि रोख मानधनावरील कर्मचारी यांच्या मागण्या, यासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. शहरामध्ये सुरू असलेली सर्व पावसाळापूर्व कामे नियोजनपूर्वक वेळेत पूर्ण करुन नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना आमदार गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. अतिवृष्टी आणि पावसाळ्यातील अन्य संकटकालीन परिस्थितीमध्ये बचाव कार्यासाठी यंत्रणा चौकस ठेवावी अशा सूचना आमदार नाईक यांनी या बैठकीत केल्या. नवी मुंबईतील पाणी टंचाईवर आमदार नाईक यांनी अतिशय आक्रमकपणे जनतेच्या भावना मांडल्या. प्रशासकीय काळामध्ये शहरात पाण्याची समस्या वाढली. नवी मुंबईमध्ये पाणीटंचाईचे सबळ कारण नाही. शहरासाठी स्वतंत्र असे मोरबे धरण आहे, केवळ काही अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागतो आहे, असा आरोप त्यांनी केला.
मोरबे धरणाचे पाणी पनवेलच्या काही ग्रामीण भागामध्ये वळविण्यात येत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. संदीप नाईक यांनी बारवी आणि हेटवणे धरणातून नवी मुंबईला मिळणारा पाणी कोटा पुरेपूर काटेकोरपणे उपलब्ध करून घेण्याची मागणी यावेळी केली. त्याचबरोबर शहरातील सर्व भागात समान पाण्याचे वितरण झाले पाहिजे, अशी सूचना केली. नवी मुंबईकरांना तहानलेले ठेवून जर त्यांच्या वाट्याचे पाणी कोणी अन्यत्र वळवणार असेल तर ते सहन करणार नाही. आयुक्त नार्वेकर यांनी पाणीटंचाई प्रश्नावर गांभीर्याने चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
- परिवहन उपक्रमामध्ये बस संचलनासाठी सुमारे 250 वाहकांची बाह्य पध्दतीने भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेवर आमदार नाईक यांनी आक्षेप घेत बस वाहक परिवहन उपक्रमामार्फतच भरती केला जावा असे स्पष्ट करुन सदर भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली. प्रत्येक विभागामध्ये 24 तास पोलीस कर्मचारी आणि महापालिकेचे सुरक्षारक्षक तैनात करावेत. अनधिकृत फेरीवाल्यांचा त्रास कमी करावा, असेही नाईक म्हणाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai