शिक्षण क्षेत्रालाही महागाईची झळ
- by Aajchi Navi Mumbai
- May 27, 2023
- 408
पालकांच्या खिशाला जीएसटीमुळे अधिकचा भार
पनवेल ः गेल्या काही वर्षांपासून जीवनावश्यक वस्तू आणि विविध गोष्टींच्या दरांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. या महागाईची झळ आता शिक्षण क्षेत्रालाही बसली आहे. शैक्षणिक साहित्यावर 18 टक्के जीएसटी आकारल्यामुळे वह्या, पुस्तके, दप्तर, पेन, पेन्सिल, नोटपॅड, कंपास आदी शैक्षणिक वस्तू 20 ते 50 टक्क्यांनी महागल्या आहेत. सर्वसामान्य पालकांच्या खिशाला जीएसटीमुळे अधिकचा भार सोसावा लागत आहे.
कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले असताना आता शैक्षणिक साहित्यावर आकारल्या जाणाऱ्या भरमसाट जीएसटीमुळे शिक्षणही महागले आहे. कागदाचे वाढलेले दर, नवीन अभ्यासक्रम, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषयांच्या पाठ्यपुस्तकांची एकूण भागामध्ये विभागणी, वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके आदींमुळे पहिली ते दहावीच्या पुस्तकांच्या किमतीत 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे, मात्र दुसरीकडे पालकांना 18 टक्के जीएसटीचे अतिरिक्त ओझे सहन करावे लागत आहे. गेल्यावर्षी 700 रुपयांना मिळणाऱ्या शालेय दप्तरासाठी आता 900 रुपये मोजावे लागणार आहे. तर इंधन दरवाढीमुळे स्कूल बसच्या शुल्कातही 15 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
कागदासह शैक्षणिक साहित्यावर जीएसटी आकारल्यामुळे पाठ्यपुस्तकांच्या किमतींमध्ये वाढ झालेली आहे. समोरून आलेल्या किमतीत शालेय साहित्य विक्री करावी लागत आहे. त्याचा भुर्दंड पालकांवर पडत असल्याने पालकवर्ग नाराजी व्यक्त करत आहेत. - व्यावसायिक
- इयत्ता दहावीच्या गणित भाग 1 म्हणजेच बीजगणिताच्या पाठ्यपुस्तकाची किंमत गतवर्षी 88 रुपये होती, ती आता 113 रुपये झाली आहे. तर अभ्यासक्रम बदलल्यामुळे जुनी पाठ्यपुस्तके अर्ध्या किंमतीमध्ये विकणाऱ्या विक्रेत्यांवर उपलब्ध असलेल्या जुन्या पुस्तकांचा साठा रद्दीमध्ये काढण्याची वेळ आली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai