विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 14, 2023
- 544
उरण ः तालुक्यातील जेएनपीए न्हावा शेवा बिजनेस पार्क (डि. पी वर्ल्ड ) सेझ कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात व सावरखार ग्रामस्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामसुधारणा मंडळ सावरखार तर्फे सोमवार 12 जूनपासून सेझच्या गेटसमोर सकाळी 10 वाजल्या पासून आमरण उपोषणला सुरवात करण्यात आली आहे.
सावरखारच्या जमिनी जेएनपीए, न्हावा शेवा बिजनेस पार्क (डि. पी वर्ल्ड) सेझच्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात संपादित झाली आहेत. 70 टक्केहुन जमिनी या सावरखार ग्रामस्थांच्या प्रकल्पासाठी संपादित झाले आहेत. स्थानिक भूमीपुत्रांच्या, शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पाला कवडीमोल भावाने शेतकऱ्यांनी विकल्या आहेत. जमीन संपादनावेळी प्रकल्पग्रस्तांना स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीवर घेण्याचे आश्वासन सेझ प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना, स्थानिक भूमीपुत्रांना दिले होते. मात्र त्यांना नोकरीत सामावून घेतले नाही. परप्रांतीयांची भरती करून स्थानिक भूमीपुत्रांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सेझने केले आहे. सावरखार ग्रामस्थांना कोणत्याही निर्णयात विश्वासात घेत नसल्याने तसेच सेझ प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही सावरखार ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होत नसल्याने शेवटी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामसुधारणा मंडळ सावरखारच्या पुढाकाराने जेएनपीए, न्हावा शेवा बिजनेस पार्क (डि. पी.वर्ल्ड) सेझ यांच्या विरोधात आमरण उपोषण पुकारले आहे. या आंदोलनाला सर्वच राजकीय पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai