एनआरआय कॉम्प्लेक्समध्ये स्वच्छतेचा जागर
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 07, 2023
- 280
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून स्वच्छतेचे महत्व जनतेमध्ये प्रसारित करण्यात येत आहे. या अनुषंगाने शुक्रवारी बेलापूर विभागात एनआरआय कॉम्प्लेक्स 1 सारख्या बहुनिवासी निवासी संकुलाच्या सभागृहात तेथील रहिवाश्यांशी स्वच्छतेविषयी सुसवांद साधणारी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत अभियानाचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी उपस्थितांना शून्य कचऱ्याचे महत्व विशद केले.
आपल्या घरातून जितका कमीत कमी कचरा घराबाहेर जाईल तितके स्वच्छतेचे मानांकन उंचावेल हे स्पष्ट करीत डॉ. बाबासाहेब राजळे यांनी थ्री आर संकल्पना उलगडून सांगितली. यामध्ये प्रत्येकाने शक्य होईल तितका कमी कचरा निर्माण करण्याकडे लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे घरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता कम्पोस्ट बास्केटचा वापर करून ओल्या कचऱ्याचे खतात रूपांतर करण्याची प्रक्रिया घराघरात केली जावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच निरूपयोगी सुका कचरा पुनर्वापरात आणावा अथवा त्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी दिला जावा असेही त्यांनी सांगितले.
यासोबतच हजारो वर्षे नष्ट न होणारा प्लास्टिकचा भस्मासूर रोखण्यासाठी व आपले आणि आपल्या पुढील पिढ्यांचे भविष्य जपणुकीसाठी प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा असे आवाहन केले. प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे थांबवून कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करण्याचा निर्धार करावा आणि तो अंमलात आणावा असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक नागरिकाने कचरा हा निव्वळ कचरा नाही हे ओळखून थ्री आरच्या तत्वांची अंमलबजावणी करावी आणि ही माहिती केवळ आपल्यापुरती मर्यादित न ठेवता आपल्या शेजा-यांना व संपर्कात येणा-या प्रत्येकाला अशा प्रकारची कार्यवाही करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे त्यांनी सांगितले. याकरिता सोसायटी पातळीवर जागरूकता गट निर्माण करण्यात येणार असून ज्या सोसायटीमध्ये ही प्रक्रिया प्रभावीपणे राबविली जाईल तेथील स्वच्छताकर्मींना आसपासच्या इतरही सोसायट्यांमध्ये प्रबोधन करण्यासाठी पाठविले जाणार असल्याची माहिती उपआयुक्तांनी दिली. यावेळी उपस्थित असलेल्या सोसायटीतील नागरिक व कर्मचारी यांचेसमवेत स्वच्छतेची शपथ ग्रहण केली व एकमुखाने ‘निश्चय केला, नंबर पहिला' घोषणेचा गजर केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai