पनवेलकरांना तीन आरोग्य केंद्रांची भेट
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 16, 2023
- 489
पनवेल : पनवेलकरांच्या आरोग्यासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात शहरी व ग्रामीण लोकवस्तींमध्ये 12 आरोग्य वर्धिनी केंद्र व उप केंद्र सूरु करण्यात आली आहेत. पालिकेने स्वातंत्र्यदिनी मंगळवारी सकाळी खांदेश्वर, कामोठे व कळंबोलीतील नागरिकांना नवे तीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची भेट दिली.
कामोठे वसाहतीमध्ये सेक्टर 22, खांदेश्वर वसाहतीमधील सेक्टर नऊ आणि कळंबोली येथील प्रभाग कार्यालयात ह्या नवीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन मंगळवारी सकाळी पालिका आयुक्त गणेश देशमुख आणि भाजपचे पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालिकेचे कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालिका क्षेत्रात 20 हून अधिक नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रातून आरोग्य सेवा दिली जाण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्यापैकी 15 आरोग्य वर्धिनी केंद्र पालिकेने आतापर्यंत सूरु केली आहे. पालिका क्षेत्रातील रोहिंजन सारख्या गावात सुद्धा पालिकेने दवाखाना सूरु केला आहे. खारघर येथे आपला दवाखाना पालिकेने सूरु केला आहे. या दवाखान्यातून दिवसाला तीनशेहून अधिक रुग्णांना बाह्य रुग्ण सेवा दिली जाते.
रात्री उशीरापर्यंत रुग्णसेवा मिळत असल्याने पालिकेचे दवाखाने आणि नागरि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णांचा कल वाढत असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली. पालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी काही दिवसांत तळोजा औद्योगिक वसाहतीमधील तोंडरे गाव आणि तळोजा वसाहतीमधील सिडकोच्या गाळ्यांमध्ये उपलब्ध झाली असून तेथेही पालिका दवाखाना सूरु करत असल्याचे सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai