इमारत उभी राहण्यापूर्वीच पाया खचला
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 09, 2024
- 427
33 कोटींच्या ग्रंथालय इमारतीच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेद्वारा तब्बल 33 कोटी 31 लाख रुपये खर्च करुन सानपाडा सेक्टर-11 येथे उभारण्यात येणाऱ्या मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या ग्रंथालय इमारतीचा पाया रचताना उभारण्यात आलेल्या पायलिंगचे पिलर मंगळवारी रात्री 10 वाजता या बांधकाम साईटवर उभ्या असलेल्या जेसीबी मशीनवर कोसळण्याची घटना घडली.
सदर दुर्घटनेमुळे या ग्रंथालय इमारतीच्या शेजारी असलेल्या भूमी पॅराडाईज को-ऑप हौसिंग सोसायटीच्या इमारतीला पण धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या सोसायटीतील रहिवाशांनी ग्रंथालय इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप करत या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान, आयआयटी तज्ञांना गुरुवारी बोलविण्यात आले असून त्यांच्यामार्फत इमारतीच्या कामकाजाची चौकशी केली जाणार असल्याचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले. सानपाडा सेक्टर-11 येथील भूखंड क्र. 1 वर नवी मुंबई महापालिकेद्वारा 33 कोटी रुपये खर्च करुन मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीच्या उभारणीचे काम 17 एप्रिल 2023 रोजी सुरु करण्यात आले. सध्या या इमारतीचा पाया उभारणी करिता पायलिंग करण्याचे काम सुरु आहे. सदर पायाभरणीचे काम सुरु झाल्यानंतर त्या परिसरातील माजी नगरसेविका ऋचा पाटील यांनी सदर बांधकामाबाबत गत 26 ससप्टेंबर रोजी आक्षेप नोंदवत मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून या बांधकामासाठी शेजारी असलेल्या नाल्याचे पाणी वापरले जात असल्याची बाब महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
तसेच सदर इमारतीच्या बांधकामासाठी तेथील फुटपाथवर अपामण करण्यात आले असून पादचाऱयांना त्याचा त्रास होत आहे. तसेच रात्री उशीरापर्यंत येथे बांधकाम सुरु राहत असल्याने शेजारील इमारतीला धोका निर्माण झाल्याच्या पारी येथील रहिवाशांनी केल्या होत्या. तसेच या बांधकामासाठी अनधिकृतरित्या वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचे आरोप देखील करण्यात आले होते. मात्र प्रशासनाने आपल्या व भूमी पॅराडाईजमधील रहिवाशांच्या पारींची दखल घेतली नसल्याचा आरोप ऋचा पाटील यांनी केला आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री 10 वाजता ग्रंथालय इमारतीच्या बांधकाम साईटवर भूमी पॅराडाईज इमारती लागत उभारण्यात आलेले पायलिंग कोसळले. या दुर्घटनेमुळे भूमी पॅराडाईज इमारतीची सुरक्षा भिंत देखील कोसळण्याच्या मार्गावर असून या इमारतीला देखील धोका निर्माण झाल्याची पार तेथील रहिवाशांनी केली आहे. महापालिका अधिकाऱयांचे येथील बांधकामाकडे पुर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप देखील या रहिवाशांनी केला. त्यामुळे मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीचे बांधकाम कंत्राटदार मे. अश्विनी इफ्रा डेव्हलपमेंट प्रा. लि. यांनी निकृष्ट दर्जाचे केले असल्याचा आरोप करत या इमारतीच्या कामाचे महापालिका आयुक्तांनी थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणी माजी नगरसेविका ऋचा पाटील व भूमि पॅराडाईज सोसायटीमधील रहिवाशांनी केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai