तुर्भे डेपोत दोन बस खाक
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 09, 2024
- 301
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेच्या (एनएमएमटी) तुर्भे आगारात उभ्या असलेल्या दोन बस जळुन खाक झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. इलेक्ट्रीक बसमधील बॅटरीचा स्फोट होऊन ही आग लागल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी देखील एनएमएमटीच्या इलेक्ट्रीक बसेस बॅटऱ्यांचा स्फोट होऊन आगीच्या भक्षस्थानी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
एनएमएमटीच्या तुर्भे आगारात उभ्या असलेल्या इलेक्ट्रीक बसला रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच संपुर्ण बसला ही आग लागली. या आगीची झळ बाजुला उभ्या असलेल्या एनएमएमटीच्या दुसऱ्या बसला देखील लागली. त्यामुळे या आगीत सदर बसने सुद्धा पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनस्थळी धाव घेऊन दोन्ही बसला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai