वाशीत नंदेश उमप यांची संगीत मैफल
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 04, 2024
- 261
आरोग्य सुविधांकरिता कार्यक्रमाचे आयोजन
नवी मुंबई : लायन्स क्लब ऑफ ऐरोली शाखेच्यावतीने आरोग्य संजीवनी उपक्रमाअंतर्गत आरोग्य विषयक सुविधांकरीता निधी संकलन करण्यासाठी महाराष्ट्राचा कणखर आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गायक नंदेश उमप यांच्या मराठी आणि हिंदी गाण्याची संगीत मैफल आयोजित करण्यात आली आहे. येत्या शुक्रवार 5 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात ही संगीत मैफल नवी मुंबईकर रसिकांना अनुभवता येणार आहे.
नवी मुंबई शहराच्या ऐरोली विभागात लायन्स क्लब मागील 35 वर्षांपासून वैद्यकीय, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रीय आहे. आज अनेक उपचाराकरीता महागडी वैद्यकीय साधने असल्याने त्याचा लाभ गरजू रुग्णांना घेता येत नाही, त्यांना लागणारा खर्चाचा भार कमी व्हावा, यासाठी नवीन वैद्यकीय उपकरणे देण्यासाठी तसेच लायन्स क्लबच्या माध्यमातून ऐरोलीत प्रथमच अद्ययावत नेत्र तपासणी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी लायन्स क्लबच्या वतीने आरोग्य संजीवनी उपक्रमाअंतर्गत वैद्यकीय केंद्र आणि इतर सामाजिक उपक्रमांसाठी मदत निधी उभारण्याकरीता सदर संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले असून समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन लायन्स क्लबच्यावतीने मनोज ब्रीद यांनी केले आहे.
लायन्स क्लबने गणेश दर्शन स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, चित्रकला स्पर्धा आणि गरजू रुग्णांना माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या उपक्रमांना नागरिकांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्याच पद्धतीने नागरिकांनी गरजवंतासाठी आपला खारीचा वाटा उचलत या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संस्थेद्वारे करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai