अनधिकृत झोपड्यांवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- May 28, 2024
- 433
नवी मुंबई ः अे विभाग बेलापूर कार्यालयाअंतर्गत बेलापूर ब्रिजखाली अनधिकृतपणे झोपड्या उभारण्यात आलेल्या होत्या. आयुक्तांच्या आदेशान्वये व उप आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार अे विभाग बेलापूर कार्यालयाचे शशिकांत तांडेल सदर 48 अनधिकृत झोपड्या निष्कासित करण्यात आल्या आहेत.
कोपरखैरणे विभागात कारवाई
कोपरखैरणे विभागा अंतर्गत बजरंग महादेव गोळे, रूम नंबर 335 सेक्टर-15 कोपरखैरणे, व कारभारी रामभाऊ ढोले, रूम नंबर 122 सेक्टर 05, कोपरखैरणे यांनी पालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे आर.सी.सी. स्वरूपाचे बांधकाम सुरू केले होते. या अनधिकृत बांधकामास दोनवेळा नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते. सदरची दोन्ही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत.
- 638 अनाधिकृत झोपड्या निष्कासित
सी विभाग वाशी कार्यालयाअंतर्गत वाशीगांव व सेक्टर- 31 येथे बेकायदेशीर / अनधिकृत झोपडपटटया वसलेल्या आहेत तसेच वाशीगांव परिसरातील नमुंमपा व सिडकोच्या जागेवर अनधिकृत झोपडया वसलेल्या आहेत. केरळा भवन ते वाशी हायवे पर्यंत, वाशी येथील उद्यानाकरीता आरक्षीत असलेल्या मोकळ्या भूखंडावर, वाशी सायन पनवेल हायवे लगत तसेच वाशीगांव खाडी किनारी लगत उभारण्यात आलेल्या झोपडपटटयांवर तोडक कारवाई करुन एकूण 638 अनाधिकृत झोपड्या निष्कासित करण्यात आल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai