फ्लेमिंगोला ड्रोनचा धोका आहे का?
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 15, 2024
- 248
तपासण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे गृह विभागाला निर्देश
नवी मुंबई : नवी मुंबईतील पाणथळ प्रदेशात विसावलेल्या फ्लेमिंगोचे छायाचित्रण करण्यासाठी ड्रोनचा वापर वाढत आहे. याबाबत पर्यावरण प्रेमी करून चिंता व्यक्त करण्यात येत असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या गृह विभागाला या समस्येकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.
नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तक्रार केली असून, आम्ही उत्साही लोकांमध्ये पक्ष्यांवर धोकादायकपणे ड्रोन नेव्हिगेट करण्याचे वेड वाढत असल्याचे पाहिले आहे .सर्वांपेक्षा वेगळी व विस्मयकारक सुंदर चित्रे आणि रील्स सोशल मीडियावर फिरत आहेत, परंतू वन्यजीव छायाचित्रकारांनी लक्षात घेतले पाहिजे की ड्रोन पक्ष्यांसाठी धोकादायक आहेत, असे नॅटकनेक्टने म्हटले आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत समाविष्ट असलेले फ्लेमिंगो हे अतिशय संवेदनशील पक्षी आहेत आणि त्यांना ड्रोनवरील ब्लेडने दुखापत होऊ शकते किंवा ते मारले जाऊ शकतात, त्यामुळे फोटोग्राफी करणाऱ्यांनी ड्रोनचा वापर करू नये. नॅटकनेक्ट ने केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने ई-मेल द्वारे सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव-गृह विभाग यांना या समस्येकडे लक्ष देण्यास आणि कारवाई करण्यास सांगितले आहे. चिंताजनक गोष्ट म्हणजे ड्रोन पक्षी उडत असतानाही त्यांचा जवळून पाठपुरावा करतात.
ड्रोनमधून येणारा आवाजही घाबरून उडणाऱ्या पक्ष्यांना त्रास देऊ शकतो आणि हे पक्ष्यांसाठी धोकादायक आहे, असे पक्षी निरीक्षक ज्योती नाडकर्णी यांनी सांगितले. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात भरतीच्या पाण्याची पातळी वाढल्यावर टीएस चाणक्य, एनआरआय आणि डीपीएस फ्लेमिंगो अधिवास क्षेत्रामध्ये उतरणाऱ्या पक्ष्यांना ड्रोन त्रास देतात. अशाप्रकारे, नवी मुंबईचे मोठे जलस्रोत ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यच्या उपग्रह ओल्या जमिनी म्हणून काम करतात.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai