पावसाळी जल उदंचन केंद्राचे भूमिपूजन
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 27, 2024
- 290
नवी मुंबई ः बेलापूर से.12 येथे सिडकोकालीन 40 वर्ष जूनी पावसाळी जलउदंचन केंद्राची जीर्ण झालेली इमारत तोडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधणे तसेच नवीन पंपींग मशीनरी बसविण्यात येणार आहे. या कामाचा भूमीपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला. या कामामुळे सीबीडी बेलापूर परिसरातील पावसाळी कालावधीत काही भागात पाणी साचण्याची समस्या निकाली निघणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
नवी मुंबई पालिकेच्या वतीने बेलापूर विभागातील से.12 येथे पावसाळी जल उदंचन केंद्राचे जीर्ण बांधकाम तोडून नवीन जल उदंचन केंद्राची इमारत बांधण्यासाठी सीआरझेडचा ना हरकत दाखला प्राप्त झाला असून साधारणत: 34 कोटी रक्क्म खर्च करुन ही इमारत व तेथील यंत्रणा उभारण्यात येत आहे. या कामाचे भूमीपूजन नुकतेच करण्यात आले. याकामी बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले याचा विशेष उल्लेख आयुक्तांनी याप्रसंगी केला. कामाचा कालावधी 14 महिने असला तरी हे काम 12 महिन्यात पूर्ण करावे असे सूचित करीत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी होल्डींग पाँड हे शहराचे संरक्षक असून त्यात गाळ साचल्याने व खारफुटी वाढल्याने त्याची पाणी धारण क्षमता कमी झाली असल्याचे सांगितले. त्यामुळे मोठया भरतीच्या वेळी अतिवृष्टी झाल्यास आपले शहर समुद्र सपाटीच्या भरतीरेषेपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने शहराच्या सखल भागात पाणी साचते याचा अनुभव आपण 21 जुलै 2024 रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या काळात दुपारी घेतला. या पाणी साचण्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने पाणी साचलेल्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करत कारणे जाणून घेतली. त्यामध्ये होल्डींग पाँडची सफाई करणे अत्यंत गरजेचे असल्याचे लक्षात आले आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिका तत्परतेने आवश्यक परवानग्या घेण्याची कार्यवाही करेल असे आयुक्त म्हणाले.
यावेळी बोलताना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवीन पावसाळी जल उदंचन केंद्र बांधण्यात येत असल्याने बेलापूर विभागातील नागरिकांच्या वतीने आनंद व्यक्त केला. यामुळे विशेषत्वाने सीबीडी बेलापूर येथील से.4,5,6 भागातील इमारती रस्त्यापासून सखल भागात येत असल्याने त्याठिकाणी भरतीच्या व पावसाच्या काळात जमा होणाऱ्या पाण्याचा त्रास यापूढे होणार नाही याचा विशेष उल्लेख केला. अतिवृष्टीमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होईपर्यंत या भागातील नागरिकांना होणारा त्रास स्वत: अनुभवला असल्याचे सांगून त्यांनी या कामाचा पाठपुरावा केल्याची माहिती दिली. याप्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, परिमंडळ 1 चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, सहा आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, कार्यकारी अभियंता संजय पाटील व अजय संखे, माजी नगरसेवक अशोक गुरखे, निलेश म्हात्रे, भरत जाधव, दिपक पवार, दिनानाथ पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai