वाशीमधील जॉगर्स पार्कवर अंधार
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 10, 2024
- 301
अनेक पथदिवे बंद : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नवी मुंबई : वाशी सेक्टर 10 मधील राजीव गांधी जॉगर्स पार्कमध्ये अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. तर काही ठिकाणी पथदिव्यांचा लुकलुकाट सुरू आहे. नादुरुस्त पथदिव्यांमुळे संध्याकाळी उशिरा येथून जाताना नागरिक धास्तावत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हे पथदिवे दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
आरोग्याबाबत जागरूक शहरवासीयांची सकाळी व संध्याकाळी वाशीमधील सेक्टर 10 येथील राजीव गांधी जॉगर्स पार्क परिसरात चालण्यासाठी नेहमीच गर्दी असते. अनेक नागरिक या ठिकाणी संध्याकाळी उशिरापर्यंत फेरफटका मारताना दिसतात. काही दिवसांपासून या पार्कमधील अनेक पथदिव्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. काही पथदिवे लुकलुकत आहेत तर काही पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत परिसरामध्ये अंधार पसरत आहे. काही दिवसांपूर्वी पार्कमध्ये नाग जातीचा सर्प पकडण्यात आला. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथून चालताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरिता नागरिकांमधून या पथदिव्यांची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी होत आहे. लवकरच येथील पथदिव्यांची दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती महापालिका विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता कुशल गुंजाळ यांनी सांगितले.
- नागिन पकडण्यात यश
राजीव गांधी जॉगर्स पार्कवर काही दिवसांपूर्वी सर्पमित्र तसेच येथील सुरक्षारक्षक संतोष यांनी नागीन व तिच्या चार पिल्लांना पकडून सुरक्षित स्थळी नेऊन सोडले. यावेळी त्यांनी नागरिकांना फुलांसाठी जीव धोक्यात घालून उद्यानात न जाण्याची विनंती केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai