लाडकी बहीणसाठी 1 लाखाहून अधिक अर्ज पात्र
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 26, 2024
- 607
नवी मुंबई ः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या नियोजनानुसार पडताळणी प्रक्रियेअंती नवी मुंबई पालिका क्षेत्रातून 1 लाखाहून अधिक अर्ज पात्र झाले असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात 50 हजाराहून अधिक पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांच्या लाभाची रक्कम रू. 3 हजार जमा झालेली आहे. त्यामुळे महिला भगिनींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मुख्यमंत्री महोदयांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' जाहीर केल्यानंतर आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या 111 प्रभागांमध्ये योजनेची मदत केंद्रे सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत सुरू करण्यात आली व या केंद्रांव्दारे योजनेचे अर्ज भरून घेण्यात आले. याशिवाय महापालिका क्षेत्रातील 226 अंगणवाड्यांमध्येही अंगणवाडी सेविकांव्दारे महिलांपर्यंत पोहोचून त्यांचे अर्ज भरण्याची कार्यवाही करण्यात आली. महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाचे समुह संघटक आणि आरोग्य विभागाच्या आशा वर्कर तसेच महिला बचत गटांनाही योजनेचा प्रचार, प्रसार तसेच अर्ज भरून घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले. अर्ज भरण्यासोबतच अर्ज पडताळणीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विहित वेळेत अर्ज निकाली निघावेत यादृष्टीने मुख्यालय स्तरावर अर्ज पडताळणीसाठी तातडीने दोन वॉर रूम स्थापित करण्यात आल्या. 15 ऑगस्टपूर्वी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 50 हजारहून अधिक महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाची रक्कम रू. 3 हजार जमा झालेली आहे. सुरूवातीला नारीशक्ती दूत ॲपव्दारे अर्ज नोंदणी होत होती. त्यामध्ये सुधारणा करीत शासनाच्या वतीने योजनेचे पोर्टल सुरू झाल्यानंतर अर्ज नोंदणीला अधिक वेग आला. त्यानुसार अर्ज पडताळणी कामाकडेही समांतर लक्ष देत महानगरपालिकेतील वॉर रूम तशाच प्रकारे सक्षमतेने कार्यरत ठेवण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातही पडताळणी करून 50 हजाराहून अधिक पात्र अर्ज पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. याशिवाय पहिल्या टप्प्यातील अर्जांपैकी अर्ज मंजूर झाल्याचा संदेश प्राप्त होऊनही बॅक अकाऊंट आधार कार्ड सीडेड नाहीत अशा 19157 महिलांना त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करून घ्यावे म्हणजे लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा होईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अशा महिलांनी आपल्या बँकेत जाऊन आधार कार्ड सीडींग करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे 31 जुलैपर्यंत नारीशक्ती दूत ॲपवरून 1990 महिलांचे अर्जांची कागदपत्रे अपूर्ण होती तसेच 1 ऑगस्टपासून नवीन पोर्टल सुरू झाल्यानंतर 6556 महिलांचे अर्जांमधील कागदपत्रे अपूर्ण असल्याचे आढळले. अशा महिलांना कोणती कागदपत्रे अपूर्ण आहेत याबाबतचे संदेश त्यांच्या मोबाईलवर तांत्रिक प्रणालीद्वारे प्राप्त झालेले आहेत. त्या महिलांनी आपली आवश्यक योग्य कागदपत्रे महानगरपालिकेच्या मदत केंद्रांमध्ये जाऊन अथवा अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहचून द्यावीत व ती कागदपत्रे पोर्टलवर नोंदणी करावीत असेही आवाहन करण्यात येत आहे. अशा महिलांपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून पोहोचून त्यांची कागदपत्रे पूर्ण करून घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai