सप्तशृंगी संस्थेकडून 60 मान्यवरांना खान्देश भूषण पुरस्कार
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 01, 2025
- 450
सप्तशृंगी देवी मंदिराचा 20 वा वर्धापनदिन उत्साहात
नवी मुंबई : सीबीडी बेलापूर येथील सप्तशृंगी देवी मंदिराचा 20 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात होम हवन आणि मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यात प्रशासन, पत्रकारीता, आरोग्य, उद्योग, समाजसेवा या क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना खान्देश भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सकाळ मीडियाचे मुख्य संपादक निलेशजी खरे, मुंबई विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. अजय भामरे, एस पी आय टी कॉलेज, अंधेरीचे प्राचार्य डॉ. बी एन चौधरी तसेच आयआयटी पवईच्या संगणक विभागाचे प्राध्यापक डॉ. आर के जोशी आणि स्थानिक माजी नगरसेवक अशोक गुरखे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. खान्देशातून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडमध्ये येऊन विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने खानदेशचे नाव मोठे करणाऱ्या जवळपास 60 सन्माननीय बांधवांचा खान्देश भूषण पुरस्काराने सत्कार करण्यात आला. यात प्रामुख्याने साम टीव्हीचे सिनियर अँकर प्रोड्युसर गिरीश निकम, सकाळचे मीडियाचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट दीपक पाटे, दैनिक लोकमतचे उपवृत्त संपादक नारायण जाधव, वृत्त मानसचे मच्छिंद्र पाटील, जी एस टी विभागाचे जॉइंट कमिशनर संजय निकम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनवणे, एसी पाटील कॉलेज-खारघरचे निवृत्त प्राचार्य डॉ.दिलीप बोरसे, आदर्श शिक्षण संस्था, पनवेलचे संस्थापक अध्यक्ष धनराज विसपुते, खानदेश रहिवासी संघ, खारघरचे अध्यक्ष तसेच बिल्डर मधू पाटील, डॉ.अशोक पाटील, बी के थोरात आदींचा समावेश होता.
या कार्यक्रमात खानदेशी विनोदी कलाकार विलासजी शिरसाठ यांनी आपल्या विनोदी शैलीतून उपस्थितांना खळखळून हसवले. त्यांच्या अहिराणी भाषेतील मिमिक्रीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. सप्तशृंगी चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, विशेषतः रमाकांत नागरे, रमेश चित्ते, . दौलत पाटील, ॲड विनोद येवले, अँड जितेंद्र पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र रौंदळे यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai