Breaking News
उरण ः आयएनएस टुनिर (भारतीय नौदल) उरण येथील अग्निशमन मुख्यालयातील नागरी संरक्षण कर्मचारी राकेश बेदी यांनी अथेन्स ग्रीस येथे 2025 मध्ये संपन्न झालेल्या ॲक्रोपोलिस आंतरराष्ट्रीय वुशू स्पर्धेत भाग घेउन सिल्व्हर मेडल मिळवत भारताचे नाव उंचाविले आहे.
राकेश मनोज बेदी हे राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय वुशू, जु-जित्सू आणि ज्युडो खेळाडू आहेत. अलिकडेच 28 फेब्रुवारी 2025 ते 2 मार्च 2025 दरम्यान ग्रीसमधील अथेन्स शहरात संपन्न झालेल्या ॲक्रोपोलिस आंतरराष्ट्रीय वुशू चॅम्पियनशिप 2025 साठी त्यांची निवड झाली होती. या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करत राकेश बेदी यांनी इतिहास रचत सिल्वर मेडल प्राप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला राकेश बेदी यांनी सिल्वर मेडल मिळवून दिल्याने राकेश बेदी यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राकेश बेदी यांनी सर्वांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे. राकेश बेदी हे एक चांगले आणि वुशू, ज्युडो/जु-जित्सू(ॲथलीट),भारतीय नौदल आणि महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व करणारे उत्तम खेळाडू आहेत. त्यामुळे भारताला एक उत्तम खेळाडू मिळाल्याने भारताचे नाव आता सातासमुद्रापलीकडे गेले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai