‘व्हॉट्स ॲप चॅटबॉट’ वरुन भरता येणार मालमत्ताकर व पाणी देयक
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 14, 2025
- 222
नवी मुंबई ः नवी मुंबईकर नागरिकांना महानगरपालिकेशी संबधित सेवा मोबाईलच्या एका क्लिकवर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जात असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन सुविधा उपलब्धता हे लक्ष्य नजरेसमोर ठेवून लोकाभिमुख कार्यप्रणाली राबवली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ताकर अथवा पाणीपट्टी भरण्यासाठी सर्व प्रकारच्या ऑनलाईन सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिल्या असून नागरिक महानगरपालिकेची वेबसाइट ... तसेच ॲप यावरुन आपली देयक रक्कम भरु शकतात. याशिवाय क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड तसेच जीपे, फोनपे, पेटीएम अशा सर्व युपीआय सुविधांव्दारेही करभरणा सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये आता ‘व्हॉट्स ॲप चॅटबॉट’ ही नवी डिजीटल सेवा सुरु करण्यात आली असून याव्दारे नागरिकांना आपल्या मालमत्ताकराविषयी तसेच पाणीपट्टी विषयची माहिती आणि देयक भरणासह इतर सेवा सर्वाधिक वापरल्या जाणा-या सोशल मिडिया माध्यमावर अर्थात व्हॉट्स ॲपवर सहज उपलब्ध असणार आहेत. याकरिता 8291920504 हा नवी मुंबई महानगरपालिकेचा अधिकृत व्हॉट्स ॲप चॅटबॉट क्रमांक असून ही सेवा वापरण्यासाठी नागरिकांनी या क्रमांकावर केवळ असा संदेश पाठवायचा आहे.
यानंतर चॅटबॉट त्या व्यक्तिशी संवाद साधेल.
- सुरुवातीला मराठी अथवा इंग्रजी असा भाषेचा पर्याय निवडण्यास सांगण्यात येईल.
- त्यानंतर मालमत्ता कर किंवा पाणीपट्टी यापैकी माहिती हवी असलेली सेवा निवडावी लागेल.
- मग आपला मालमत्ता आयडी किंवा पाणी ग्राहक क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
- त्यानंतर नागरिकांना मालमत्ता कराची माहिती किंवा पाणी बिलाची माहिती, नवीन बील प्रत, थेट पेमेंट लिंक मिळवता येईल.
- याव्दारे नागरिक आपल्या देयक रक्कमेची माहिती मिळवू शकतात तसेच थेट पेमेंट लिंकव्दारे आपली देयक रक्कमही भरणा करु शकतात.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयीन कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नागरिकांना सुलभ रितीने सेवा उपलब्ध व्हाव्यात या करिता महानगरपालिका प्रयत्नशील असून ‘व्हॉट्स ॲप चॅटबॉट’ हे पारदर्शक, जलद व सुलभ सेवा देण्यासाठी महानगरपालिकेने उचललेले एक महत्वाचे पाऊल असून नागकािंनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai