महिलांकरिता मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 12, 2025
- 119
नवी मुंबई ः महापालिकेच्या समाजविकास विभागामार्फत बेलापूर भवन, से.11, सी.बी.डी. बेलापूर तसेच ऐरोली विभाग कार्यालय, से.3, ऐरोली, नवी मुंबई या ठिकाणी मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या सल्ला केंद्रामध्ये नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आर्थिकदृष्टया दुर्बल तसेच गरजू महिलांवर होत असलेले अत्याचार, त्यांच्या कौटुंबिक व आर्थिक बिकट परिस्थितीबाबत मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
तरी, नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील आर्थिकदृष्टया दुर्बल तसेच गरजू महिलांनी समाज विकास विभाग कार्यालय, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर भवन इमारत, 1ला मजला, से.11, सी.बी.डी., बेलापूर येथे अथवा ऐरोली विभाग कार्यालय, तळमजला, से.3, ऐरोली येथे मोफत कायदेविषयक सल्ला केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai