महिला स्वच्छताकर्मींसाठी विशेष आरोग्य व स्वच्छता शिबिर
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 01, 2025
- 108
नवी मुंबई ः शेल्टर असोसिएट्स संस्थेच्या सहयोगाने घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत महिला स्वच्छताकर्मी अर्थात स्वच्छतासखींकरिता ‘विशेष आरोग्य व स्वच्छताविषयक शिबीर’ वाशी येथील महात्मा फुले भवन याठिकाणी आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 300 हून अधिक महिला स्वच्छताकर्मींनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.
नवी मुंबई शहर स्तरावरील दैनंदिन स्वच्छता कार्यात महत्वाचा भाग असणाऱ्या महिला सफाई कर्मचारी यांना या आरोग्य शिबिरात मासिक पाळी आणि आरोग्य या विषयावर समजेल अशा स्वरूपात माहिती देण्यात आली. यामध्ये मासिक पाळी कालावधीत घ्यावयाची स्वच्छता व काळजी याबाबत सविस्तर शास्त्रीय माहिती सोप्या पध्दतीने देण्यात आली तसेच यादरम्यान महिलांनी कापडी पॅड अथवा सॅनिटरी कपचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मासिक पाळी कालावधीत महिलांकडून वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडमुळे कचऱ्याची समस्या निर्माण होत आहे. तो वेगळा गोळा होत नसल्याने त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी अडचणी येतात. हा कचरा सार्वजनिक शौचालय, ड्रेनेज लाईन यामध्ये येऊन या वाहिन्या तुंबतात. शिवाय महिलांना आरोग्याच्या समस्यासुद्धा होतात. याविषयी संस्थेमार्फत वस्ती पातळीवर महिलांसोबत कार्यशाळा घेण्यात येते तसेच त्यांच्याशी थेट संवाद साधून, चर्चा करून, विविध खेळाच्या माध्यमातून सोप्या पध्दतीने माहिती देण्यात येते. महिलांनी सॅनिटरी पॅडला पर्याय म्हणून मेनस्ट्रुअल कपचा वापर करण्याबाबत त्यांना सूचित करण्यात येते व शेल्टर असोसिएट्स संस्थेच्या वतीने हे कप मोफत दिले जातात अशी माहिती यावेळी देण्यात आली.
शेल्टर असोसिएशन मार्फत आत्तापर्यंत 1050 महिलांना दिलेले हे कप वापरायला सुरवात झाली आहे. पुढील 7 ते 8 वर्षात या महिलांमार्फत 8,82,000 एवढ्या सॅनिटरी पॅडचा कचरा निर्माण होणार नाही, शिवाय त्या कुटुंबाचा सॅनिटरी पॅडवर होणारा खर्चही वाचणार आहे. याशिवाय 630 कि.ग्रॅ. एवढे कार्बन उत्सर्जनसुद्धा थांबले आहे. या प्रकल्पाबद्दल वस्ती पातळीवरील महिलांप्रमाणे महापालिकेच्या महिला सफाईकर्मींनाही माहिती मिळावी यादृष्टीने आयोजित या विशेष शिबिराचा लाभ 300 हून अधिक स्वच्छतासखींनी घेतला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai