मसाजच्या नावाखाली जबरदस्तीने देहव्यापार
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 06, 2025
- 104
छापा टाकुन सहा पीडित महिलांची सुटका
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने वाशी सेक्टर 11, जुहूगाव येथील आरपणाच सलून आणि स्पावर छापा टाकुन मसाजच्या नावाखाली सुरु असलेल्या या बेकायदेशीर धंद्यातून सहा पीडित महिलांची सुटका केली आहे. तसेच सदरचे सलून आणि स्पा चालवणाऱ्या महिला मॅनेजरला अटक केली आहे. पोलिसांनी आता फरार असलेला तिचा पार्टनर नूर आलम शेख याचा शोध सुरु केला आहे.
वाशी सेक्टर-11, जुहूगांव येथील आरपणाच सलून ऍन्ड स्पामध्ये मसाजच्या नावाखाली 6 हजार रुपये घेऊन महिलांकडून जबरदस्तीने देहव्यापार करवला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे 30 नोव्हेंबर रोजी दुपारी सदर स्पामध्ये बनावट ग्राहकाला पाठवण्यात आले होते. सदर स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवण्यात येत असल्याची खात्री पटल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे, तसेच पोलीस अमंलदार अनिल मांडोळे, ठाकुर, चव्हाण, पारासुर, अडकमोल,भोये आदींच्या पथकाने आरपणाच सलून ऍन्ड स्पावर छापा टाकला.
यावेळी सदर स्पामध्ये आढळून आलेल्या सहा महिलांकडुन मसाजच्या नावाखाली जबरदस्तीने देहव्यापार करुन घेण्यात येत असल्याचे सदर महिलांच्या चौकशीत उघड झाले. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सदर स्पाची मॅनेजर आसिमा रॉबिन घोष (34) व तिचा साथीदार नूर आलम शेख या दोघांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 143(3), 3(7) अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1976 कलम 3, 4, 7 व 7(1) अंतर्गत गुन्हा दाखल करुन आसिमा घोष हिला अटक केली आहे. न्यायालयाने तिची 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे. पोलिसांनी आता फरार आरोपी नूर आलम शेख याचा शोध सुरु केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai