48 झोपडपट्टींचे होणार पुनर्वसन
- by मोना माळी-सणस
- Feb 18, 2026
- 41
बेलापुर मतदासंघातील 72665 झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर; आ.मंदा म्हात्रे यांचा पाठपुरावा
नवी मुंबई ः नवी मुंबई पुनर्वसनाचे वारे जोरात वाहत असून यामध्ये आता झोपडपट्टयांच्या पुनर्वसनालाही गती मिळणार आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे झोपु योजनेच्या अमंलबजावणीसाठी तात्काळ उपाययोजना राबविण्याचा निर्णय गृनिर्माण विभागाने घेतला आहे. त्यामुळे लवकरच बेलापूर विधानसभा क्षेत्रातील गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या 48 ठिकाणच्या झोपडपट्टीमधील 72665 झोपडीधारकांना हक्काचे घर मिळणार आहे.
नवी मुंबईत बेलापुर विधानसभा मतदार संघात सिडकोच्या जमिनीवर 17, एमआयडीसी परिसरात 29, आणि शासकीय जमिनीवर 2 अशा एकुण 48 ठिकाणी झोपडपट्टी वसलेल्या आहेत. यामध्ये 72 हजार 665 झोपड्या आहेत. अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात झोडपट्टीतील नागरिक हलाख्याच्या परिस्थितीत राहत आहेत. या लोकांना पुनर्वसनाचे वेध लागले आहेत. आ. मंदा म्हात्रे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, त्यांनी मंत्रालय स्तरावर सकारात्मक बैठक घडवून आणली आहे. आ. म्हात्रे यांची गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासोबत (ता. 17) मंत्रालयात झोपडपटट्ी पुनर्वसन संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत झोपडपटट्ी पुनर्वसन प्रकल्पांतची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव तसेच विविध शासकीय विभागांमधील समन्वय याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्पांची अमंलबजावणी गतीमान करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याच्या प्रक्रियेत बायोमेट्रिक सर्वेक्षण, डीएसआर तयार करणे व पात्र व अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तुर्भे येथील शिवाजीनगर झोपडपट्टीचे सर्वेक्षण सुरू 3 सी या टप्प्यात पोहोचले असून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश भोयर यांनी दिल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. या योजनेद्वारे सन 2000 च्या आधीच्या झोपडीधारकांना मोफत मालकी हक्क मिळणार आहे. तर 2000 ते 2011 नंतरच्या झोपडीधारकांना अडीच लाख रुपये भरुन मालकी हक्क प्राप्त होणार आहे. शिवाय कोणतेही कागदपत्र नसलेल्या लाभार्थ्यांना कोणतेही एक ओळखपत्र देऊन पुनर्वसनाचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे लवकरच झोपडपट्टीतील रहिवाशांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली. याबाबत आपण लवकरच मेळावा घेणार आहेत. योजनेमध्ये पात्र होण्यासाठी कोणते कागदपत्रे सादर करायचे आहेत. याबाबत एक कार्यशाळा घेणार असल्याचेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
- या झोपडपटट्टींचे होणार पुनर्वसन
रमाबाई आंबेडकर नगर, से -9 (गावस्कर मैदान) सीबीडी, रमाबाई आंबेडकर नगर, से -8, सीबीडी, संभाजीनगर, सीबीडी, जय दुर्गा माता नगर, सीबीडी, निलगिरी गार्डन व नेरूळ विभागातील बोनसरी, माऊली स्टोन, महात्मा गांधी नगर, बोनसरी कॉरी, शिवाजीनगर तसेच तुर्भे येथील आंबेडकर नगर, गणेश नगर, इंदिरानगर, गणपती पाडा, से -21,23,24, हनुमान नगर, तुर्भे स्टोर.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस